गडचिरोली विमानतळासाठी १०४ कोटींच्या निधीला मंजुरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 14:18 IST2026-05-13T14:16:30+5:302026-05-13T14:18:13+5:30
Nagpur : राज्याचे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने प्रस्तावित असलेल्या गडचिरोली विमानतळ प्रकल्पाला मोठे प्रशासकीय आणि आर्थिक बळ मिळाले आहे.

Approval for a fund of Rs 104 crore for Gadchiroli Airport
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्याचे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने प्रस्तावित असलेल्या गडचिरोली विमानतळ प्रकल्पाला मोठे प्रशासकीय आणि आर्थिक बळ मिळाले आहे. राज्य सरकारने या विमानतळाच्या भूसंपादनासाठी १०४ कोटी ४८ लाख ६४ हजार २३९ रुपयांच्या खर्चाला अधिकृत मंजुरी दिली आहे.
३११ हेक्टर जमिनीचे संपादन
या प्रकल्पांतर्गत शिरापूर चक, गुरुवला, हिरापूर आणि राखी या गावांमधील एकूण ३११.८१ हेक्टर जमिनीचे अधिग्रहण केले जाणार आहे. यामध्ये शासकीय, खासगी आणि वनविभागाच्या जमिनीचा समावेश आहे.
महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (एमएडीसी) पाठवलेल्या प्रस्तावाला मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील सक्षम समितीने ८ मे रोजी झालेल्या बैठकीत मंजुरी दिली. त्यानंतर सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित केला. माहितीनुसार २४५.७५ हेक्टर खासगी जमिनीच्या अधिग्रहणासाठी ७६ कोटी ९९ लाख ७४ हजार ७९९ रुपये खर्च आणि ३४.६८ हेक्टर वन जमिनीच्या हस्तांतरणासाठी १० कोटी ७ लाख ४५ हजार ४०० रुपये खर्च होणार आहेत. उर्वरित रक्कम प्रशासकीय खर्च, आस्थापना आणि इतर तांत्रिक कामांसाठी वापरली जाईल. शासन निर्णयानुसार, ३१.३८ हेक्टर जमीन कोणत्याही मोबदल्याशिवाय महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे हस्तांतरित केली जाणार आहे.