शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील अतिक्रमण कारवाईत ‘एपीआय’चे ‘मज्जावतंत्र’ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 00:42 IST

माटे चौकाजवळ गुरुवारी झालेल्या अतिक्रमण कारवाईच्या वेळी नागपूर पोलिसांच्या एका ‘एपीआय’चे अजबच ‘मज्जावतंत्र’ पाहायला मिळाले. अतिक्रमण कारवाईची माहिती घेण्यासाठी गेलेल्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना जाण्यापासून रोखण्यात आले व असभ्य वर्तन करण्यात आले.

ठळक मुद्देप्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना जाण्यापासून रोखले : माजी नगरसेवकाशीदेखील असभ्य वर्तन

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : माटे चौकाजवळ गुरुवारी झालेल्या अतिक्रमण कारवाईच्या वेळी नागपूर पोलिसांच्या एका ‘एपीआय’चे अजबच ‘मज्जावतंत्र’ पाहायला मिळाले. अतिक्रमण कारवाईची माहिती घेण्यासाठी गेलेल्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना जाण्यापासून रोखण्यात आले व असभ्य वर्तन करण्यात आले. तर नागरिकांच्या समस्या ऐकण्यासाठी गेलेल्या माजी नगरसेवकाला तर अक्षरश: ओढत बाहेर काढण्यात आले.दुपारच्या सुमारास कारवाईमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. याची माहिती मिळताच प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी तेथे पोहचले. तेथे गेल्यावर एका प्रतिनिधीला घटनास्थळावर जाण्यास ‘एपीआय’ शिवचरण पेठे यांनी मज्जाव केला. पत्रकार असल्याचे सांगितल्यावरदेखील ते ऐकण्यास तयार नव्हते व धक्काबुक्की करत तेथून दूर करण्यात आले. त्यानंतर कारवाईचे ‘व्हिडीओ’ काढण्यास मनाई केली व मोबाईल हिसकण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला येथे ‘व्हिडीओ’ आणि फोटो काढण्याचा अधिकार नाही, अशी पेठे यांची भाषा होती. यासंदर्भात कुठले पत्र किंवा लेखी निर्देश आहे का अशी विचारणा केली असता पेठे यांनी अरेरावीची भाषा वापरली. माझी कमिश्नर काय, जिथे हवी तिथे तक्रार करा. मी कुणाला घाबरत नाही, असे ते म्हणाले.कारवाई सुरू होण्याअगोदर त्यांनी स्थानिक रहिवाशांनादेखील तेथून हाकलले. माजी नगरसेवक प्रसन्न बोरकर तेथे गेले असता त्यांना तर चक्क उचलून बाहेर काढण्यात आले. विद्यमान नगरसेवक प्रमोद तभाने यांनादेखील मज्जाव करण्यात आला होता. पोलिसांच्या या अरेरावीच्या वागणुकीमुळे नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला होता. न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई सुरू होती. परंतु स्थानिक निवासी, लोकप्रतिनिधी, प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी असभ्य वर्तन करण्याचा अधिकार पोलिसांना कुणी दिला, असा संतप्त सवाल नागरिकांनी व्यक्त केला.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणPoliceपोलिस