शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाड्यांना मिळणार नवी ओळख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:07 IST

नागपूर : भारतासह जगात आणि महाराष्ट्रात ऐतिहासिक स्त्री-पुरुषांची नावे विविध वास्तूंना द्यायची जुनी परंपरा आहे. त्यांचे विचार-कृतीची ती प्रेरणास्थळे ...

नागपूर : भारतासह जगात आणि महाराष्ट्रात ऐतिहासिक स्त्री-पुरुषांची नावे विविध वास्तूंना द्यायची जुनी परंपरा आहे. त्यांचे विचार-कृतीची ती प्रेरणास्थळे असतात. त्यामुळे त्यांच्या स्मृती चिरतरुण असतात. असाच काहीसा संकल्प नागपूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीने केला आहे. विभागांतर्गत येणाऱ्या अंगणवाड्यांना प्रेरणादायी महिलांच्या नावाने नवी ओळख मिळणार आहे. जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्यांवर प्रेरणादायी स्त्रियांच्या नावाच्या पाट्या लागणार असून, अंगणवाड्यांची ही नवी ओळख ठरणार आहे.

राज्यात पहिल्यांदाच ही संकल्पना जि.प.च्या महिला व बालकल्याण समितीने ठेवली. त्यासंदर्भात ठरावही मंजूर करून घेतला. देशाच्या इतिहासात अनेक महिलांचे कर्तृत्व वाखाणण्याजोगे राहिले आहे. सामाजिक क्षेत्राबरोबरच कला, क्रीडा, राजकारण, शिक्षण, विज्ञान, संशोधन, वैद्यकीय अशा सर्वच क्षेत्रात उत्तुंग काम करणाऱ्या आणि करीत असलेल्या महिलांच्या नावाने अंगणवाडी ओळखली जाणार आहे. नागपूर जिल्ह्यात २,१६१ अंगणवाड्या व २६२ मिनी अंगणवाड्या आहेत. प्रत्येक अंगणवाडीवर प्रेरणादायी महिलेच्या नावाची पाटी असणार आहे. सोबतच त्यांच्या छायाचित्रासह संक्षिप्त माहितीचा आढावा असणार आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने या संकल्पनेची घोषणा महिला व बालकल्याण सभापती उज्ज्वला बोढारे यांनी केली.

- या देशात महिलांचे योगदान प्रेरणादायी आहे. गावातील अंगणवाडीच्या माध्यमातून समाजाला व लाभार्थ्यांना अशा थोर महिलांची प्रेरणा मिळण्याचा उद्देश आहे. सोबतच या माध्यमातून त्यांच्या स्मृतींना उजाळा मिळणार आहे.

-उज्ज्वला बोढारे, सभापती, महिला व बालकल्याण विभाग