शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडीचे बांधकाम रखडले

By admin | Updated: August 6, 2014 01:14 IST

महादुला येथे दोन अंगणवाड्या मंजूर आहेत. एका अंगणवाडीचे बांधकाम मंजूर असताना गेल्या दोन वर्षांपासून अंगणवाडीचे बांधकाम केले नाही. ग्रामपंचायत प्रशासनाने अंगणवाडीच्या

महादुला येथील प्रकार : जागेचा घोळ, चिमुकल्यांच्या जीवितास धोकामहादुला (रामटेक) : महादुला येथे दोन अंगणवाड्या मंजूर आहेत. एका अंगणवाडीचे बांधकाम मंजूर असताना गेल्या दोन वर्षांपासून अंगणवाडीचे बांधकाम केले नाही. ग्रामपंचायत प्रशासनाने अंगणवाडीच्या इमारतीसाठी पुरेशी जागा उपलब्ध करून न दिल्याने बांधकाम रखडले असल्याचे समजते. सध्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना ओल्या खोलीत राहावे लागत असल्याने त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. एकात्मिक बालविकास प्रकल्पाद्वारे १ ते ६ वयोगटातील मुलांना उत्तम आरोग्य देण्यासाठी व त्यांना कुपोषणमुक्त जीवन देण्यासाठी शासनातर्फे विविध उपाययोजना केल्या जातात. त्यांना उत्तम आरोग्य हे चांगल्या परिसरात व इमारतीत मिळू शकते. परंतु महादुला येथे चिमुकल्यांना ओल्या खोलीत राहावे लागत असल्याने पालक संताप व्यक्त करीत आहेत. सध्या पावसाळा सुरू आहे. येथील अंगणवाडी केंद्राला भेट दिली असता, सर्व भिंतींना ओल आली आहे. तसेच तेथील जमिनीवर ओलावा असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.येथील अंगणवाडी केंद्रात एका खोलीचे प्लास्टर विद्यार्थ्यांच्या अंगावर कोसळण्याची भीती आहे. सिमेंटचे प्लास्टर एखाद्या मुलास जखमी करू शकते, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दोन वर्षांपूर्वी येथे अंगणवाडी इमारतीस मंजुरी मिळाली. ग्रामपंचायतकडे त्याबाबत प्रस्ताव आला. त्यामुळे जागेचा शोध सुरू झाला. अंगणवाडीला लागूनच दुसरी अंगणवाडी इमारत तयार करण्याचे ठरले. परंतु यासाठी काही ग्रामस्थांनी विरोध दर्शविला. अंगणवाडी परिसरातील मोकळ्या जागेवर विविध कार्यक्रम होतात, त्यामुळे त्यास अडचण निर्माण होईल, असे सांगण्यात आले. विशेष म्हणजे येथे आमदार निधीतून व्यायाम शाळा बांधण्यात आली आहे. तेथे कुणीही व्यायाम करायला जात नाही. ही इमारत जैसे थे बेवारस पडली आहे.दुसरी जागा आदिवासी वस्तीत देण्याचे ठरविण्यात आले. तेथेही विरोध झाला. तेथे आदिवासी जनता स्वत:चे बांधकाम करणार आहे. तेथील मोकळी जागा खोलगट असल्याने ठेकेदाराने लक्ष दिले नाही. तेव्हापासून हे काम ठप्प पडले आहे. (वार्ताहर)