अमरावतीत शुक्रवारी सर्वाधिक ४५.५ डिग्री तापमान

By Admin | Updated: May 24, 2014 01:09 IST2014-05-24T01:09:20+5:302014-05-24T01:09:20+5:30

विदर्भात उष्णतेची लाट पसरली आहे. अमरावती जिल्ह्यातील तापमानाने ४५ डिग्री सेल्सिअसच्या पलीकडे झेप घेतली आहे. यामुळे नागरिकांच्या जीवाची लाहीलाही होत असताना हवामान खात्याने येत्या ४८

Amravat most Friday at 45.5 degrees | अमरावतीत शुक्रवारी सर्वाधिक ४५.५ डिग्री तापमान

अमरावतीत शुक्रवारी सर्वाधिक ४५.५ डिग्री तापमान

वादळी पावसाची शक्यता : हवामान तज्ज्ञांचा इशारा

अमरावती : विदर्भात उष्णतेची लाट पसरली आहे. अमरावती जिल्ह्यातील तापमानाने ४५ डिग्री सेल्सिअसच्या पलीकडे झेप घेतली आहे. यामुळे नागरिकांच्या जीवाची लाहीलाही होत असताना हवामान खात्याने येत्या ४८ तासांत पुन्हा वादळी वार्‍यासह पावसाची शक्यता वर्तविली आहे. पावसाच्या आगमनामुळे उन्हापासून दिलासा मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. विदर्भात गेल्या काही दिवसांत तापमानात मोठा बदल जाणवला. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तापमान ४४ अंशावर गेले होते. त्यानंतर पावसाच्या सरीदेखील कोसळल्या. त्यामुळे चार ते पाच दिवस तापमान कमी झाले. मे महिन्याच्या सुरुवातीला ४० ते ४२ डिग्री तापमानाची नोंद करण्यात आली. त्यामुळे उकाडा निर्माण झाला होता. मात्र, मे महिन्याच्या २० तारखेनंतर तापमान वाढले आहे. शुक्रवारी २३ मे रोजी अमरावतीमध्ये ४५.५ डिग्री तापमानाची नोंद करण्यात आली. हे यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक तापमान असल्याची माहिती आहे. सद्यस्थितीत बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने विदर्भात ढगाळ वातावरण आहे. या स्थितीला ‘डिप्रेशन’ असेही म्हटले जाते. कमी दाबाच्या पट्टयामुळे ढगाळ वातावरण निर्माण झाले असून ते वार्‍याच्या दिशेने विदर्भाकडे वळले आहे. यामुळे येत्या ४८ तासांत वादळी वार्‍यासह पावसाची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे नागरिकंनी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. यंदा मान्सून १० जूनच्या जवळपास धडकण्याचे संकेत हवामान तज्ज्ञांनी दिले आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Amravat most Friday at 45.5 degrees