शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे मेन्ससाठी जुन्या विद्यार्थ्यांचे रियुनियन ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:07 IST

अजनी वाचवा नागपूर : कुठल्याशा प्रकल्पासाठी अजनीची रेल्वे मेन्स शाळा तुटणार ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. ही माहिती जुन्या सहकाऱ्यांकडून ...

अजनी वाचवा

नागपूर : कुठल्याशा प्रकल्पासाठी अजनीची रेल्वे मेन्स शाळा तुटणार ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. ही माहिती जुन्या सहकाऱ्यांकडून नाशिकला राहणाऱ्या रुक्मिणी जोशी यांनाही मिळाली आणि त्यांनी नागपूरकडे धाव घेतली. रविवारी शाळेसाठी स्वाक्षरी अभियान राबविले जात असल्याचे कळताच त्याही सहभागी झाल्या. रुक्मिणी या १९८१ च्या बॅचच्या. आश्चर्य म्हणजे त्यांच्या बॅचमधून त्या एकट्या नव्हत्या. त्यांच्यासोबत दहावीपर्यंत शिकलेले १०-१२ सहकारीही आंदोलनासाठी पोहचले होते.

एकीकडे अजनी कॉलनी परिसरातील हजारो झाडांची कटाई थांबावी म्हणून पर्यावरणप्रेमी सरसावले असताना दुसरीकडे या प्रकल्पामुळे पाडली जाणारी रेल्वे मेन्स शाळा वाचविण्यासाठी शाळेचे माजी विद्यार्थी एकजूट झाले आहेत. शाळा तोडली जाऊ नये म्हणून सुरू असलेल्या आंदोलनात आपलाही खारीचा वाटा देण्यासाठी माजी विद्यार्थी सहभागी होत आहेत. माजी विद्यार्थी अनिकेत कुत्तरमारे याच्या पुढाकाराने रविवारी शाळेसाठी स्वाक्षरी अभियान राबिवले. साेशल मीडियावर याबाबत माहिती मिळताच अनेक जुने विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले. १९८१ च्या बॅचमधून रुक्मिणी यांच्यासह मनिषा उपासनी, तेजस्विनी दलदले, माया विश्वकर्मा, सुषमा मांडळकर, डाॅ. प्रशांत खेडकर, दीपक बुटले, अतुल जाेशी, सतीश डाेंगरे, किशाेर जाधव यांचा समावेश हाेता. याशिवाय डाॅ. हर्षवर्धन कांबळे (८७ बॅच), मिलिंद टानपे (८३ बॅच), अनिल कुळकर्णी व सुहास कुळकर्णी (८२ बॅच), संगीता साेंधिया, मंदा चाैरे, मालती चाैधरी, सीमा पाटील, कल्पना बुरेले, नम्रता वाळके, कविता निमसरकर (सर्व ९१ बॅच), शैलेश मेश्राम (२००२ बॅच) आणि २०११ मध्ये पासआऊट झालेले मंगेश आंबुलकर, स्वाती मून, समीक्षा डाेंगरे, अपेक्षा रामटेके व आदिती अनेवार यांचा समावेश आंदाेलनात हाेता.

सावित्रीबाइ फुले यांची जयंती साजरी

स्वाक्षरी अभियानादरम्यान जमा झालेल्या सर्व विद्यार्थ्यांनी यावेळी क्रांतिज्याेती सावित्रीबाइ फुले यांची जयंती साजरी केली. तेव्हा सर्वांना शाळेचे जुने दिवस आठवले. या माजी विद्यार्थ्यांपैकी अनेकजण त्यांच्या नाेकरीतून निवृत्त झाले आहेत. अनेक डाॅक्टर, इंजिनिअर व अनेक विदेशात स्थायिक झाले आहेत. अनेकजण माेठ्या पदावर आहेत. त्या सर्वांनी शाळेप्रति संवेदना व्यक्त करीत त्यांचे आयुष्य घडविले तसे भविष्यात इतर विद्यार्थी घडवावे, अशी भावना व्यक्त केली. शाळा वाचविण्यासाठी कुठल्याही आंदाेलनात सहभागी हाेण्याची भावना त्यांनी व्यक्त केली.