शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
2
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
3
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
4
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
5
GT vs MI : कोण आहे Danish Malewar? रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सनं विदर्भकारावर खेळला मोठा डाव; पण...
6
सौदीच्या एका शब्दाखातर पाकिस्तानने मोडला ४२ हजार कोटींचा करार! सुदानला मोठा झटका!
7
इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले 
8
अमेरिकेची सात विमाने शस्त्रास्त्रांसह इस्लामाबादमध्ये दाखल; इराणच्या राष्ट्रपतींनी केली 'ही' मोठी मागणी!
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान बेपत्ता, जामीन अर्जावर कोर्टात काय घडले? 
10
नेपाळमध्ये राहणं झालं महाग! बालेन सरकारचा 'तो' एक नियम आणि ५० लाख मधेशींची झोप उडाली!
11
"देवेंद्र फडणवीस पूर्वी असे नव्हते, पण आता ते फक्त...", आरक्षणाच्या मुद्द्यावरून अंजली दमानिया यांची मुख्यमंत्र्यांवर टीका
12
TCS कांड: "'प्लेयर', 'झिरो फिगर', तुझ्या शारीरिक गरजा...!" शाहरुख, रजा, आसिफच्या कृत्यानं पीडिता हादरली; एकदा तर...
13
Video: धावत्या ट्रॅव्हलमध्ये शिरला, चालकाला सपासप कानाखाली मारल्या; नवी मुंबईत आरटीओ अधिकाऱ्याची दबंगगिरी 
14
Deepa Bhati : 'ती' जिंकली! ३ मुलांची आई लग्नाच्या १८ वर्षांनंतर झाली अधिकारी; टोमणे मारणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर
15
छत्तीसगडमध्ये चार्टर्ड विमान डोंगररांगांना धडकले; विमानाचा भीषण स्फोट, Video...
16
पॅन कार्डचा खेळ अन् डिलिव्हरी बॉयचं आयुष्य झालं नरक; ९.५ कोटींच्या कंपनीचा मालक पाहून पोलीसही चक्रावले!
17
जपानच्या किनाऱ्यावर बोटींची पळापळ...! खोल समुद्रात जाण्यासाठी एकामागोमाग एक, मोठी रांग,  १० फूट उंच त्सुनामीचा इशारा
18
तीन वर्षाच्या लेकीचा होता वाढदिवस, आई वडिलांसह चिमुकलीचा घरात मिळाला मृतदेह; पोलिसांनी सांगितलं काय घडलं? 
19
Video - हौसेला मोल नाही! ७४ वर्षांच्या 'आजी'चा स्वॅग; न घाबरता केलं पॅराग्लाइडिंग, म्हणाल्या...
20
Jammu Accident : २१ निष्पापांचा बळी घेणाऱ्या 'त्या' बसवर होते ८ चालान; उधमपूर अपघाताची इनसाईड स्टोरी!
Daily Top 2Weekly Top 5

महायुतीत ‘ऑल इज नॉट वेल’, नागपुरात भाजपची डोकेदुखी वाढली, आभा पांडे बंडखोरीच्या भूमिकेत

By योगेश पांडे | Updated: September 18, 2024 22:42 IST

पक्षाने तिकीट नाकारले तर अपक्ष लढणार

योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: भाजपकडून नागपूर शहरातील सर्व जागांवर उमेदवार उतरविण्याची तयारी सुरू झाली असताना पुर्व नागपुरात मात्र पक्षाची डोकेदुखी वाढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या व राज्य महिला आयोगाच्या सदस्य आभा पांडे यांनी या मतदारसंघातून उमेदवारीचा बिगुल वाजवला आहे. मला राष्ट्रवादीने तिकीट नाही दिले तरी यावेळेस मी निवडणूक लढणारच अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यामुळे महायुतीतच उमेदवारीवरून धुसमूस सुरू असल्याचे चित्र स्पष्ट झाले असून ‘ऑल इज नॉट वेल’ अशीच स्थिती असल्याचे दिसून येत आहे.

मागील तीन विधानसभा निवडणूकीपासून कृष्णा खोपडे हे पुर्व नागपुरातून विजयी झालेले आहेत. यावेळी विजयी चौकार लावण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. लोकसभा निवडणूकीतदेखील पुर्व नागपुरातूनच भाजपला सर्वाधिक मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे त्यांची तिकीटाची दावेदारी मजबूत असल्याचे बोलले जात आहे. जो उमेदवार जिंकू शकेल त्यालाच उमेदवारी मिळेल अशी भूमिका नागपुरात महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत मांडण्यात आली होती. मात्र नागपुरातूनच या भूमिकेला सुरूंग लागताना दिसतो आहे. आभा पांडे यांनी काहीही झाले तरी पूर्व नागपुरातून निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे.

राष्ट्रवादीने तिकीट नाही दिले तर जनतेसाठी मी अपक्ष म्हणून निवडणूक लढेन अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. आभा पांडे यांना २०१७ साली झालेल्या मनपा निवडणूकीत जवळपास ११ हजार मते मिळाली होती. शिवाय त्यांच्या प्रभागातील अनेक बुथ पुर्व नागपुरात येतात. त्यामुळे त्या सक्रियपणे विरोधात उतरल्या तर निश्चितच भाजपच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

सक्रिय प्रचाराला सुरुवात

नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघातून मी कृष्णा खोपडे यांच्या विरोधात निवडणूक लढवावी ही इथल्या स्थानिक जनतेची मागणी आहे. मी माझ्या प्रचाराला सुरुवात केली आहे, असे आभा पांडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

महायुतीच्या फॉर्म्युल्यानुसारच उमेदवार : कुकडे

यासंदर्भात भाजपचे शहराध्यक्ष बंटी कुकडे यांना संपर्क केला असता महायुतीचे वरिष्ठ नेते जो फॉर्म्युला ठरवतील त्यानुसारच उमेदवार निश्चित केला जाईल असे सांगितले. पुर्व नागपूर हा भाजपचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे येथून भाजपचाच उमेदवार असणार यात काहीच शंका असण्याचे कारण नाही. आभा पांडे यांच्याशी त्यांचे पक्षनेते बोलतील असा आम्हाला विश्वास आहे, असे कुकडे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :nagpurनागपूरBJPभाजपाMahayutiमहायुती