शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांसाठी हवा ‘मार्शल प्लॅन’

By admin | Updated: November 21, 2014 00:51 IST

देशातील उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना उन्नत करायचे असेल तर त्यांच्यासाठी सरकारने ‘मार्शल प्लॅन’ राबविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी यांनी आज येथे केले.

शेतकरी संघटनेची राज्यस्तरीय बैठक : शरद जोशी यांचे प्रतिपादन नागपूर : देशातील उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना उन्नत करायचे असेल तर त्यांच्यासाठी सरकारने ‘मार्शल प्लॅन’ राबविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी यांनी आज येथे केले. शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक गुरुवारी आमदार निवास येथील सभागृहात पार पडली. या बैठकीला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी गुणवंत पाटील हंगर्गेकर होते. तर अ‍ॅड. वामनराव चटप, राम नेवले, सरोज काशीकर, शैलाताई देशपांडे, गोविंद जोशी, डॉ. आष्टीकर, अ‍ॅड. दिनेश शर्मा, विजय निवल, अनिल धनवट आदी प्रमुख नेते उपस्थित होते. शरद जोशी यावेळी बोलताना म्हणाले, जपान आणि जर्मनी हे दोन देश युद्धात बेचिराख झाले होते. तेथील शेतजमीन संपूर्णपणे नष्ट झाली होती. एकही वस्तू पिकेल अशी परिस्थिती नव्हती. अशा भीषण परिस्थितीमध्ये तेथील सरकारने खास शेतकऱ्यांसाठी ‘मार्शल प्लॅन’ तयार केला. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला भरमसाट भाव जाहीर केला. शेतात पिकविण्यात आलेल्या प्रत्येक वस्तूला प्रचंड भाव दिला. शेतकरीसुद्धा जोमाने कामाला लागले. आज जपान आणि जर्मनी ही दोन्ही राष्ट्रे कृषी उत्पादनात अग्रेसर दिसून येतात. आपल्या देशातील शेतकऱ्यांची परिस्थितीसुद्धा अतिशय बेताची झाली आहे. शेतकरी हवालदिल झाले आहेत. आत्महत्या करू लागले आहेत. तेव्हा शेतकऱ्यांना या नैराश्यातून बाहेर काढायचे असेल, त्यांना आर्थिकदृष्ट्या सुदृढ करायचे असेल तर भारतातही शेतकऱ्यांसाठी ‘मार्शल प्लॅन’ राबविण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील कापूस, सोयाबीन, धान, कांदा, द्राक्ष आदी पिकांची प्रचंड घटलेली उत्पादकता, उसाचे पडलेले दर, कापूस, सोयाबीन, धानाचे पडलेले दर, राज्याची दुष्काळी परिस्थिती व त्यामुळे अडचणीत आलेले सर्व पीक उत्पादक शेतकरी, त्यातून दिवसेंदिवस वाढत चाललेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कर्ज व वीज बिल भरू न शकण्याची तयार झालेली परिस्थिती या सर्व प्रश्नांवर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच विदर्भाचे स्वतंत्र राज्य झाल्याशिवाय विदर्भाची जनता व शेतकरी सुखी होऊ शकणार नाही, असेही या बैठकीत स्पष्ट करण्यात आले. तसेच कापसाला सहा हजार रुपये, सोयाबीनला पाच हजार रुपये, धानाला तीन हजार रुपये, उसाला रंगराजन समितीच्या शिफारशी लागू करणे, संपूर्ण कर्जमुक्ती व वीज बिल मुक्ती करणे व सोबतच सत्ताधारी पक्षाने दिलेल्या स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीची वचनपूर्ती करावी, यासाठी मुख्यमंत्र्यांच्या धरमपेठ येथील निवासस्थानासमोर ३० नोव्हेंबर रोजी ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. राम नेवले यांनी प्रास्ताविक केले.(प्रतिनिधी) मुख्यमंत्र्यांसमक्ष उलगडणार ‘मार्शल प्लॅन’ शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणारा ‘मार्शल प्लॅन’ नेमका काय आहे, हे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर होणाऱ्या ठिय्या आंदोलनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर शरद जोशी स्वत: उलगडून सांगतील.