शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासन पेचात, बजेटही गोत्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:07 IST

नागपूर : महाराष्ट्र जिल्हा परिषद अधिनियमातील काही तरतुदी आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर उद्भवलेली परिस्थिती यामुळे जिल्हा परिषद प्रशासन पेचात ...

नागपूर : महाराष्ट्र जिल्हा परिषद अधिनियमातील काही तरतुदी आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर उद्भवलेली परिस्थिती यामुळे जिल्हा परिषद प्रशासन पेचात पडले आहे. एक तरतूद अशीही आहे की, सदस्यसंख्या ५० पेक्षा कमी झाल्यास जिल्हा परिषदेवर प्रशासक नेमण्याची वेळही येऊ शकते. असे घडल्यास जिल्हा परिषदेचे बजेट गोत्यात येऊ शकते. लवकरच १६ जागांसाठी स्वतंत्र निवडणूक कार्यक्रम जाहीर करणार, असे आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे. दुसरीकडे सदस्य न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणार आहेत. या सर्व प्रक्रियेमुळे निर्माण झालेला पेच प्रशासन कसा सोडवणार, हेच बघायचे आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषदेमधील ओबीसी वर्गातील १६ सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्याचे आदेश काढले. यात उपाध्यक्षांसह काँग्रेस, भाजप व राष्ट्रवादीच्या गटनेत्यांचा समावेश आहे. १६ सदस्यांचे सदस्यत्व रद्द झालेल्या जिल्हा परिषदेत सदस्यसंख्या ४२ राहिली आहे. कमी झालेली सदस्यसंख्या अधिनियमातील तरतुदीनुसार सत्ताधाऱ्यांसाठी अडचणीची आहे. मार्च महिन्यात जिल्हा परिषदेचे बजेट सादर होणार होते. अशा परिस्थितीत बजेट सादर होईल का? याबाबतही साशंकता आहे.

- समित्यांच्या सभापती पदांचे काय?

उपाध्यक्ष हे आरोग्य व बांधकाम समितीचे सभापती आहेत. उपाध्यक्षांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक घ्यावी लागेल. तसे न झाल्यास आरोग्य व बांधकाम समितीचा प्रभार अध्यक्षांना आपल्याकडे ठेवावा लागेल किंवा इतर समिती सभापतीकडे द्यावा लागेल. त्यामुळे अध्यक्ष काय निर्णय घेतात, हे पाहणे महत्त्वाचे आहे. तीनही पक्षांच्या गटनेत्यांचे सदस्यत्व रद्द झाल्याने त्यांच्याजागी गटनेत्याची धुरा कुणाकडे येते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.