शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाइट हाऊस गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
3
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
4
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
5
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
6
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
8
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
9
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
10
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
11
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
13
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
14
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
15
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
16
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
17
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
18
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
19
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
20
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या हातावर तुरी देत आरोपी पसार

By admin | Updated: February 22, 2015 02:38 IST

वैद्यकीय तपासणीसाठी आणलेल्या आरोपीने पोलिसांना गुंगारा देत पळ काढला. ही घटना शनिवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ...

नागपूर : वैद्यकीय तपासणीसाठी आणलेल्या आरोपीने पोलिसांना गुंगारा देत पळ काढला. ही घटना शनिवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) येथे घडली. यानंतर नागपूर जिल्ह्यातील ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. मात्र रात्री उशिरापर्यंत आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले नाही.राजेश तुळशीराम राऊत (३०) रा. असे आरोपीचे नाव आहे. विनयभंग प्रकरणात त्याला जलालखेडा पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करून मध्यवर्ती कारागृहात त्याची रवानगी करण्यात आली. दरम्यान, आरोपीवर अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी तसेच तपास केल्यावर त्याच्याविरुद्ध भादंविच्या कलम ३७६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे जलालखेडा पोलिसांनी त्याला पुन्हा आपल्या ताब्यात घेतले. त्यानंतर आरोपीची वैद्यकीय तपासणी करायची असल्याने पोलिसांनी त्याला शनिवारी मेडिकलमध्ये नेले. तेथे त्याच्यासोबत पोलीस असताना त्याने नजर चुकवून पळ काढला. ही बाब लक्षात येताच पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. मात्र पोलिसांचे प्रयत्न निष्फळ ठरले. याबाबत मेडिकल बूथला सूचना देण्यात आली. आरोपी हा नागपूर शहरातून बाहेर जाण्याची शक्यता असल्याने नागपूर ग्रामीण पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी लावली. कोंढाळी पोलिसांनी कोंढाळी - काटोल मार्गावर तसेच नागपूर - अमरावती मार्गाने ये-जा करणाऱ्या वाहनांची बारकाईने तपासणी केली. यासोबतच सावनेर, काटोल, रामटेक, उमरेड, बुटीबोरी, कन्हान, कामठी पोलिसांनीही नाकाबंदी केली. अत्याचार प्रकरणाचा तपास जलालखेडा पोलीस करीत असून त्यांना माहिती मिळताच ठाणेदार पीतांबर जाधव हे रात्री मेडिकलमध्ये दाखल झाले. (जिल्हा प्रतिनिधी)