Accidental landing of Go Air flight on Nagpur Airport | गो एअरच्या विमानाचे नागपूर विमानतळावर आकस्मिक लॅण्डिंग
गो एअरच्या विमानाचे नागपूर विमानतळावर आकस्मिक लॅण्डिंग

ठळक मुद्दे तीन वर्षीय मुलगा केअर हॉस्पिटलमध्ये भरती

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हैदराबाद येथून दिल्ली येथे जाणाऱ्या गो एअरच्या विमानाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुरुवारी मध्यरात्रीनंतर १२.१० वाजता आकस्मिक लॅण्डिंग करण्यात आले.
गो एअरचे जी८ ४१६ विमानाने हैदराबाद येथून उड्डाण भरल्यानंतर काही वेळात तीन वर्षीय तक्ष सैनी नावाच्या प्रवाशाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. याची माहिती क्रू सदस्याने वैमानिकाला दिली. वैमानिकाने तातडीने नागपूर विमानतळाच्या हवाई नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला. अधिकाऱ्यांनी विमानाला उतरण्याची परवानगी दिल्यानंतर वैमानिकाने विमान नागपूर विमानतळावर उतरविले. यावेळी विमानतळावर डॉक्टरांची चमू आणि अ‍ॅम्ब्युलन्स हजर होती. मुलाला केअर हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. मुलाची तब्येत ठीक आहे.
मुलाला नागपूर विमानतळावर उतरविल्यानंतर विमान गुरुवारी मध्यरात्रीनंतर १२.३० वाजता दिल्लीकडे रवाना झाले.

Web Title: Accidental landing of Go Air flight on Nagpur Airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.