३४ रुपयांसाठी थांबलेलं स्वप्न चार दशकांनंतर पूर्ण ! ५६ वर्षीय ज्योती पाटील यांचे दहावीत दमदार यश

By मंगेश व्यवहारे | Updated: May 9, 2026 15:47 IST2026-05-09T15:44:54+5:302026-05-09T15:47:06+5:30

Nagpur : आयुष्यातील काही जखमा वेळेनुसार भरून निघतात; काही पण जखमा मनाच्या कोपऱ्यात कायम जिवंत राहतात. केवळ ३४ रुपयांच्या परीक्षा फीसाठी दहावीचे शिक्षण अर्धवट सोडावे लागलेल्या ज्योती गणेश पाटील यांनी तब्बल चार दशकांनंतर पुन्हा पुस्तक हातात घेतले

A dream that was stopped for 34 rupees, fulfilled after four decades! 56-year-old Jyoti Patil's strong success in 10th standard | ३४ रुपयांसाठी थांबलेलं स्वप्न चार दशकांनंतर पूर्ण ! ५६ वर्षीय ज्योती पाटील यांचे दहावीत दमदार यश

A dream that was stopped for 34 rupees, fulfilled after four decades! 56-year-old Jyoti Patil's strong success in 10th standard

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
आयुष्यातील काही जखमा वेळेनुसार भरून निघतात; काही पण जखमा मनाच्या कोपऱ्यात कायम जिवंत राहतात. केवळ ३४ रुपयांच्या परीक्षा फीसाठी दहावीचे शिक्षण अर्धवट सोडावे लागलेल्या ज्योती गणेश पाटील यांनी तब्बल चार दशकांनंतर पुन्हा पुस्तक हातात घेतले आणि वयाच्या ५६ व्या वर्षी दहावीच्या परीक्षेत ६१ टक्के गुण मिळवत जिद्द, चिकाटी आणि शिक्षणावरील प्रेमाचे प्रेरणादायी उदाहरण घालून दिले.

पंचशील नाइट हायस्कूलच्या विद्यार्थिनी असलेल्या ज्योती गणेश पाटील यांच्या यशाने अनेकांना नव्याने उभे राहण्याची प्रेरणा दिली आहे. ज्योती पाटील यांचे बालपण अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत गेले. त्या दहावीत असताना परीक्षा फीसाठी ३४ रुपये लागणार होते. घरची परिस्थिती बिकट असल्याने त्यांनी मामाकडे पैसांची मागणी केली. 

कुणी हसले, कुणी प्रोत्साहन दिले

२०२५-२६ या शैक्षणिक सत्रात त्यांनी पंचशील नाइट हायस्कूलमध्ये दहावीला प्रवेश घेतला. दिवसभर घरकाम, कुटुंबाची जबाबदारी आणि रात्री शाळा असा त्यांचा दिनक्रम होता. अनेकदा लोकं "या वयात शिक्षण कशाला?" असे प्रश्न विचारायचे. काही जण हसायचे, तर काही प्रोत्साहनही द्यायचे; पण ज्योती यांनी कोणत्याही टीकेकडे लक्ष न देता आपले ध्येय कायम ठेवले. आज त्यांच्या मेहनतीला यश मिळाले आहे. दहावीच्या परीक्षेत ६१ टक्के गुण मिळवत त्यांनी स्वतःचाच आत्मविश्वास पुन्हा जिंकला. "शिक्षणाला वयाचे बंधन नसते," हे आपल्या कृतीतून सिद्ध करणाऱ्या ज्योती पाटील यांनी आता पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण करण्याचा निर्धार केला आहे.

मात्र, मदत मिळण्याऐवजी अपमानास्पद शब्द ऐकावे लागले. त्या शब्दांनी त्यांच्या मनावर इतका परिणाम झाला की, त्यांनी शिक्षणालाच रामराम ठोकला. यानंतर लग्न, संसार, मुलांचे संगोपन या जबाबदाऱ्यांमध्ये त्या रमल्या तरीही शिक्षण पर्ण करण्याची इच्छा त्यांच्या मनात कायम होती. त्या एका रुग्णालयात इन्चार्ज नर्स म्हणून काम करत होत्या. मात्र, तेथेही शिक्षणावरून त्यांना कमी लेखण्यात आले. या गोष्टीने व्यथित होऊन त्यांनी २०१८ मध्ये नोकरी सोडली; पण याच क्षणापासून त्यांनी पुन्हा शिक्षणाचा ध्यास घेतला.
 

Web Title : देर से ही सही: 56 वर्षीय महिला ने दशकों बाद दसवीं पास की

Web Summary : गरीबी के कारण शिक्षा से वंचित, 56 वर्षीय ज्योति पाटिल ने चार दशक बाद 61% अंकों के साथ दसवीं की परीक्षा उत्तीर्ण की। सामाजिक संदेह का सामना करते हुए, उन्होंने दृढ़ता दिखाई, साबित किया कि शिक्षा के लिए उम्र कोई बाधा नहीं है। अब, वह डिग्री हासिल करना चाहती है।

Web Title : Dreams Deferred: 56-Year-Old Achieves Tenth Grade Success After Decades

Web Summary : Denied education due to poverty, Jyoti Patil, 56, passed her tenth-grade exams with 61% after four decades. Facing societal skepticism, she persevered, proving that age is no barrier to education. Now, she aims for a degree.