शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवसात ७५ लाखांचे नुकसान

By admin | Updated: December 19, 2015 03:06 IST

कर्मचाऱ्यांना अतिशय तोकडे वेतन असल्यामुळे महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस(इंटक)च्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदमुळे गुरुवार आणि शुक्रवारी दुपारी १२.३० वाजेपर्यंत ...

नागपूर : कर्मचाऱ्यांना अतिशय तोकडे वेतन असल्यामुळे महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस(इंटक)च्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदमुळे गुरुवार आणि शुक्रवारी दुपारी १२.३० वाजेपर्यंत एसटी महामंडळाच्या नागपूर विभागातील ५५० बसेसपैकी एकही बस आगाराबाहेर पडली नाही. दोन दिवस सुरू असलेल्या या संपामुळे महामंडळाच्या नागपूर विभागाला तब्बल ७५ लाखांचा फटका बसला. शुक्रवारी दुपारी १२.३० नंतर सर्व बसेस आपल्या नियोजित वेळेनुसार धावल्या. महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस(इंटक)च्या वतीने २०१२-२०१६ चा कामगार करार रद्द करून २५ टक्के वेतनवाढ करण्याची मागणी केली होती. १७ डिसेंबरला संप पुकारण्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांनी महिनाभरापूर्वी दिला होता. परंतु महामंडळाच्यावतीने त्यावर काहीच निर्णय न घेतल्यामुळे संघटनेने संपूर्ण महाराष्ट्रात एसटी बसेस आगाराबाहेर पडू दिल्या नाहीत. एसटी महामंडळाच्या नागपूर विभागात एकूण आठ आगार आहेत. या आठ आगारात एकूण ५५० बसेस आहेत. संपामुळे या बसेसपैकी एकही बस आगाराबाहेर पडली नाही. त्यामुळे नागपूर विभागाला तब्बल ७५ लाखांचा फटका बसला आहे. महामंडळाच्या नागपूर विभागात एकूण ११२५ चालक, ११६४ वाहक, ५८९ मेकॅनिकल आणि २८० कार्यालयीन कर्मचारी आहेत. संपामुळे हे सर्व कर्मचारी दिवसभर महामंडळाच्या आगारात रिकामे बसून होते. दरम्यान परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी संघटनेस २०१६-२०२० च्या करारात कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न निकाली लावण्याचे आश्वासन दिल्यामुळे हा संप मागे घेण्यात आला. दुपारी १२.३० वाजेनंतर नागपूर विभागातील सर्व बसेस आपल्या वेळापत्रकानुसार धावण्यास सुरुवात झाली. (प्रतिनिधी)