शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
3
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
4
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
5
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
7
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
8
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
9
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
10
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
11
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
12
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
13
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
14
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
15
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
16
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
17
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
18
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
19
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
20
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

४० संसार पुन्हा सावरले

By admin | Updated: July 9, 2014 01:07 IST

क्षुल्लक कारणावरून कुटुंबात क टुता निर्माण झाली. वाद विकोपाला गेल्याने पती-पत्नीत दुरावा निर्माण झाला होता. मंगळवारी रविभवन येथे राज्य महिला आयोगाच्या सुनावणीत सामोपचाराने अशा

महिला आयोगाची सुनावणी : मतभेद दूर केलेनागपूर : क्षुल्लक कारणावरून कुटुंबात क टुता निर्माण झाली. वाद विकोपाला गेल्याने पती-पत्नीत दुरावा निर्माण झाला होता. मंगळवारी रविभवन येथे राज्य महिला आयोगाच्या सुनावणीत सामोपचाराने अशा कुटुंबांतील मतभेद दूर करण्यात आल्याने ४० संसार पुन्हा सावरले आहेत.महिला आयोगाच्या अध्यक्षा अ‍ॅड. सुसीबेन शहा यांच्यासह सदस्या विजया बांगडे व चित्रा वाघ यांच्या उपस्थितीत ही सुनावणी घेण्यात आली. आयोगापुढे ८५ प्रकरणे तडजोडीसाठी आली होती. यातील सुनावणीसाठी ठेवण्यात आलेल्या ६६ पैकी ४० प्रकरणे निकाली काढण्यात आली. ज्या प्रकरणात समेट झाला नाही, अशी प्रकरणे ४ आॅगस्ट २०१४ च्या सुनावणीत निकाली काढली जाणार असल्याची माहिती विजया बांगडे यांनी दिली. महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला आळा बसावा, यासाठी महिला व बाल कल्याण विभाग, पोलीस स्टेशन येथील महिला समुपदेशन केंद्राच्या माध्यमातून महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न असतो. परंतु समेटानतंरही अन्याय झाल्यास अशा प्रकरणात पीडित महिलेला पोलिसात तक्र ार नोंदविण्याचा सल्ला दिला जातो, अशी माहिती बांगडे यांनी दिली.पीडित व अन्यायग्रस्त महिलांना आयोगाच्या माध्यमातून लवकरात लवकर त्यांच्या समस्या निकाली काढून न्याय मिळवून दिला जाईल. यासाठी महिलांनी तक्र ार करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन आयोगाने केले आहे. ८५ प्रकरणांत प्रामुख्याने कौटुंबिक वादाची प्रकरणे होती. तसेच मालमत्ता, भाडेकरूचा वाद अशीही काही प्रकरणे आयोगापुढे सुनावणीसाठी आली होती. यावेळी उपजिल्हाधिकारी आशा पठाण, विभागीय महिला बाल विकास अधिकारी एम.जे. बोरखेडे, बाल विकास प्रकल्प अधिकारी ए.एल. रामरामे, लक्ष्मण मानकर, भागवत तांबे, प्रभारी जिल्हा महिला बाल विकास अधिकारी रजनी कांबळे, विधी सल्लागार अमिता खोब्रागडे, वरिष्ठ समुदेशक अर्जुन दांगट, ए.डी. बांदूरकर यांच्यासह पीडित महिला व गैरअर्जदार उपस्थित होते. (प्रतिनिधी)