शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
2
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
3
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
4
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
5
GT vs MI : कोण आहे Danish Malewar? रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सनं विदर्भकारावर खेळला मोठा डाव; पण...
6
सौदीच्या एका शब्दाखातर पाकिस्तानने मोडला ४२ हजार कोटींचा करार! सुदानला मोठा झटका!
7
इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले 
8
अमेरिकेची सात विमाने शस्त्रास्त्रांसह इस्लामाबादमध्ये दाखल; इराणच्या राष्ट्रपतींनी केली 'ही' मोठी मागणी!
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान बेपत्ता, जामीन अर्जावर कोर्टात काय घडले? 
10
नेपाळमध्ये राहणं झालं महाग! बालेन सरकारचा 'तो' एक नियम आणि ५० लाख मधेशींची झोप उडाली!
11
"देवेंद्र फडणवीस पूर्वी असे नव्हते, पण आता ते फक्त...", आरक्षणाच्या मुद्द्यावरून अंजली दमानिया यांची मुख्यमंत्र्यांवर टीका
12
TCS कांड: "'प्लेयर', 'झिरो फिगर', तुझ्या शारीरिक गरजा...!" शाहरुख, रजा, आसिफच्या कृत्यानं पीडिता हादरली; एकदा तर...
13
Video: धावत्या ट्रॅव्हलमध्ये शिरला, चालकाला सपासप कानाखाली मारल्या; नवी मुंबईत आरटीओ अधिकाऱ्याची दबंगगिरी 
14
Deepa Bhati : 'ती' जिंकली! ३ मुलांची आई लग्नाच्या १८ वर्षांनंतर झाली अधिकारी; टोमणे मारणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर
15
छत्तीसगडमध्ये चार्टर्ड विमान डोंगररांगांना धडकले; विमानाचा भीषण स्फोट, Video...
16
पॅन कार्डचा खेळ अन् डिलिव्हरी बॉयचं आयुष्य झालं नरक; ९.५ कोटींच्या कंपनीचा मालक पाहून पोलीसही चक्रावले!
17
जपानच्या किनाऱ्यावर बोटींची पळापळ...! खोल समुद्रात जाण्यासाठी एकामागोमाग एक, मोठी रांग,  १० फूट उंच त्सुनामीचा इशारा
18
तीन वर्षाच्या लेकीचा होता वाढदिवस, आई वडिलांसह चिमुकलीचा घरात मिळाला मृतदेह; पोलिसांनी सांगितलं काय घडलं? 
19
Video - हौसेला मोल नाही! ७४ वर्षांच्या 'आजी'चा स्वॅग; न घाबरता केलं पॅराग्लाइडिंग, म्हणाल्या...
20
Jammu Accident : २१ निष्पापांचा बळी घेणाऱ्या 'त्या' बसवर होते ८ चालान; उधमपूर अपघाताची इनसाईड स्टोरी!
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात लोहमार्ग पोलिसांनी व्यापाऱ्याचे ४० लाख लुटले : दोघांना केले निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2019 00:00 IST

लोहमार्ग पोलिसांनी मुंबईतील एका व्यापाऱ्याचे ४० लाख रुपये लुटल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने दोघांना ताब्यात घेतले असून, या घटनेमुळे लोहमार्ग पोलिसात खळबळ उडाली आहे.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : लोहमार्ग पोलिसांनी मुंबईतील एका व्यापाऱ्याचे ४० लाख रुपये लुटल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने दोघांना ताब्यात घेतले असून, या घटनेमुळे लोहमार्ग पोलिसात खळबळ उडाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लोहमार्ग पोलिसातील संजय सुखदेवे, दर्शन झाडे हे दोन शिपाई यात सहभागी आहेत. मुंबईचा एक व्यापारी नेहमीच लाखो रुपये घेऊन दुसऱ्या राज्यात जातो. व्यापाऱ्याचा नोकर नागपुरातील पोलिसांचा मित्र आहे. त्याने याबाबतची माहिती पोलिसांनी दिली. दोघांनीही योजना आखून मुंबईला गेले. व्यापारी पैसे घेऊन निघताच त्याला रस्त्यात थांबवून जवळील ४० लाखासंदर्भात विचारणा केली. ही रक्कम हवालाची असून आम्हाला जप्त करायची असल्याचे सांगितले. व्यापाऱ्याने हे प्रकरण निपटविण्यासाठी त्यांना एक लाख रुपये देण्याची तयारी दर्शविली. परंतु पोलिसांनी पैसे न घेता व्यापाऱ्याला आपल्या वाहनात बसविले. रस्त्यात वाहन थांबवून व्यापाऱ्याला खाली उतरविले आणि पैसे घेऊन निघाले. पोलिसांनी कारवाई न करता पैसे घेऊन गेल्यामुळे व्यापाऱ्याने जवळच्या गुन्हे शाखेत धाव घेतली. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नागपूर गाठले. याप्रकरणी दोन्ही पोलीस शिपायांना लोहमार्ग पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी निलंबित केल्याची माहिती आहे.

टॅग्स :Robberyचोरीrailwayरेल्वेPoliceपोलिसsuspensionनिलंबन