लॉकडाऊनमध्ये दपूम रेल्वेची ३६४ कोटींची मालवाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:18 IST2021-01-08T04:18:49+5:302021-01-08T04:18:49+5:30

नागपूर : कोरोनाच्या काळात रेल्वेची प्रवासी वाहतूक ठप्प होऊन उत्पन्नाचे स्रोत बंद झाले; परंतु या काळातही दक्षिण पूर्व मध्य ...

364 crore freight of Dapum Railway in lockdown | लॉकडाऊनमध्ये दपूम रेल्वेची ३६४ कोटींची मालवाहतूक

लॉकडाऊनमध्ये दपूम रेल्वेची ३६४ कोटींची मालवाहतूक

नागपूर : कोरोनाच्या काळात रेल्वेची प्रवासी वाहतूक ठप्प होऊन उत्पन्नाचे स्रोत बंद झाले; परंतु या काळातही दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक मनिंदर उप्पल यांच्या नेतृत्वात एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत ५.९१ मिलियन टन माल वाहतूक करून ३६४ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविण्यात आले.

लॉकडाऊनमुळे रेल्वेची प्रवासी वाहतूक ठप्प झाली होती. रेल्वेच्या उत्पन्नाचे स्रोत बंद झाल्यामुळे दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी माल वाहतूक आणि पार्सल बुकिंगसाठी विशेष प्रयत्न केले. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने लॉकडाऊनच्या काळात कोळसा, लोखंड, सिमेंट, स्टील, खाद्यपदार्थ, मँगनीजची वाहतूक केली. मागील वर्षाच्या तुलनेत १२२ टक्के अधिक मालवाहतूक करण्यात आली. विभागाने २०२०-२१ मध्ये एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत ११११३ टन पार्सल लोडिंगच्या माध्यमातून २.४८ कोटी रुपये उत्पन्न मिळविले. मागील वर्षाच्या तुलनेत ३४.१० टक्के अधिक पार्सल वाहतूक करण्यात आली. विभागाच्या वतीने माल वाहतूक आणि पार्सल बुक करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.

Web Title: 364 crore freight of Dapum Railway in lockdown