शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

१५६ शाळांत लागणार सीसीटीव्ही

By admin | Updated: November 22, 2014 02:18 IST

जिल्हा परिषदेच्या ३०० शाळांना संरक्षक भिंत नाही. ज्या शाळा रस्त्यालगत आहेत तेथे मोकाट कुत्रे वा जनावरांचाही त्रास आहे.

नागपूर : जिल्हा परिषदेच्या ३०० शाळांना संरक्षक भिंत नाही. ज्या शाळा रस्त्यालगत आहेत तेथे मोकाट कुत्रे वा जनावरांचाही त्रास आहे. अशा शाळांतील विद्यार्थ्यांची सुरक्षा महत्त्वाची असल्याने या शाळांना संरक्षक भिंत उभारून सीसीटीव्ही लावण्याचा प्रस्ताव शुक्र्र वारी शिक्षण समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. सभापती उकेश चव्हाण यांनी ही माहिती दिली.केंद्र सरकारच्या मानव संसाधन व विकास मंत्रालयाकडे हा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविला जाणार आहे. विशेष बाब म्हणून या प्रस्तावाला मंजुरी देण्याचा केंद्राकडे आग्रह धरू. तसेच या शाळांत साऊं ड सिस्टिम यंत्रणा निर्माण के ली जाणार आहे. यात लाऊ डस्पिकर, तबला-पेटी, क्रीडा साहित्य उपलब्ध करण्याचा मानस आहे. यावर सहा कोटींचा खर्च अपेक्षित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जि.प. शाळांनी स्वच्छता मोहीम प्रभावीपणे राबविली. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करता ती यापुढेही वर्षभर राबवा, असे निर्देश शिक्षण विभागाला देण्यात आले आहे. स्वच्छता मोहिमेला प्रतिसाद मिळावा यासाठी चांगले काम करणाऱ्या शाळांना रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह, प्र्रशस्तीपत्र देऊन गौरव करणार असल्याचे चव्हाण म्हणाले.जि.प.च्या तालुकास्तरावरील शाळांत स्नेहसंमलन आयोजित केले जाते. यातून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळतो. ही बाब विचारात घेता ग्रामीण भागातील प्रत्येक शाळेत स्नेहसंमेलन आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. तसेच जि.प.च्या जास्तीतजास्त शाळांतून सेमी इंग्लिशमधून शिक्षण देण्याचा प्रयत्न असल्याची माहिती चव्हाण यांनी दिली. (प्रतिनिधी)