शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

११०० कोटींची गुंतवणूक ७५०० जणांना रोजगार

By admin | Updated: December 22, 2015 04:24 IST

वस्त्रोद्योग क्षेत्रातील अव्वल असलेल्या रेमंड कंपनीस अमरावतीजवळील नांदगाव पेठ औद्योगिक वसाहतीतील २०० हेक्टर

मुख्यमंत्र्यांनी दिले सिंघानियांना देकार पत्र : रेमंडच्या प्रकल्पासाठी दिली २०० हेक्टर जमीननागपूर : वस्त्रोद्योग क्षेत्रातील अव्वल असलेल्या रेमंड कंपनीस अमरावतीजवळील नांदगाव पेठ औद्योगिक वसाहतीतील २०० हेक्टर जमीन देण्यासंदर्भातील देकार पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज रेमंडचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक गौतम सिंघानिया यांना दिले.या प्रकल्पात ११०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल आणि ७५०० जणांना रोजगार मिळेल. आज सकाळी विधिमंडळातील मंत्रिमंडळ सभागृहात सिंघानिया यांना जमिनीचे देकार पत्र मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. त्यावेळी उद्योग मंत्री सुभाष देसाई, वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील, नगर विकास राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील, वस्त्रोद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील, आमदार डॉ.सुनील देशमुख व आमदार रवी राणा, वस्त्रोद्योग विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुनील पोरवाल, उद्योग सचिव अपूर्व चंद्रा यांच्यासह औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते. रेमंडचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक सिंघानिया म्हणाले की, रेमंड समूहाने वस्त्रोद्योग क्षेत्रात मोठे नाव कमाविले आहे. वस्त्रोद्योग क्षेत्रात भारताला मोठी संधी आहे. पंतप्रधानांच्या मेक इन इंडिया धोरणानुसार रेमंड समूहाने महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्योगांसाठीचे महाराष्ट्राचे धोरण हे देशातील सर्वात प्रभावी व चांगले धोरण आहे. तसेच उद्योग विभागाचेही मोठ्या प्रमाणावर सहकार्य मिळते. त्यामुळे रेमंड समूह राज्यात आणखी गुंतवणूक करण्यास उत्सुक आहे. रेमंड समूहाने राज्यात एकूण आठ ठिकाणी उद्योग सुरू केले आहेत. या निर्णयामुळे अमरावती जिल्ह्यातील कापूस उत्पादकांच्या कच्च्या मालाला आता हक्काची बाजारपेठ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विदर्भ, खान्देश व मराठवाड्या कापूस मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे वस्त्रोद्योगास प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने अमरावती जिल्ह्यातील नांदगावपेठसह महाराष्ट्रातील नऊ ठिकाणी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत नव्याने वस्त्रोद्योग उद्यान (टेक्सटाईल पार्क) उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या कापसाला स्पर्धात्मक भाव व बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. वस्त्रोद्योग क्षेत्राची रोजगार निर्मिती क्षमता विचारात घेऊन या उद्योगास प्रोत्साहन देण्याचा तसेच तयार कापडावर मूल्यवर्धित प्रक्रिया करून गारमेंट पार्कच्या माध्यमातून महिलांनादेखील विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा शासनाचा मानस आहे.(विशेष प्रतिनिधी)नांदगावात आणखी तीन वस्त्रोद्योग ४रेमंड उद्योग समूहाचे महाराष्ट्रात यवतमाळ, जळगाव, कोल्हापूर इत्यादी ठिकाणी वस्त्रोद्योग युनिट आहेत. सद्यस्थितीत अतिरिक्त अमरावती (नांदगाव पेठ) औद्योगिक क्षेत्रात शाम इंडोफॅब लि., व्ही.एच.एम. इंडस्ट्रिज लि., सूर्यालक्ष्मी कॉटन मिल आणि सियाराम सिल्क मिल या उद्योगांना एकूण १०२ हेक्टर जमीन वाटप करण्यात आली आहे. यातून २२०० कोटी गुंतवणूक व साधारणत: ५२०० रोजगारांची निर्मिती अपेक्षित आहे.