शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

पुरी-अहमदाबाद एक्स्प्रेसध्ये १० लाखाचा गांजा जप्त

By admin | Updated: May 7, 2015 02:11 IST

पुरी-अहमदाबाद एक्स्प्रेसने सुरतला १०० किलो १०९ ग्रॅम गांजा नेत असलेल्या तीन आरोपींना नागपूर शहर

नागपूर : पुरी-अहमदाबाद एक्स्प्रेसने सुरतला १०० किलो १०९ ग्रॅम गांजा नेत असलेल्या तीन आरोपींना नागपूर शहर गुन्हे शाखेच्या आणि लोहमार्ग पोलिसांच्या गुन्हेशाखेतर्फे रंगेहाथ अटक करून त्यांच्याकडून १० लाख ९ हजार १०० रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे.रेल्वेगाडी क्रमांक १२८४३ पुरी-अहमदाबाद एक्स्प्रेसमधून गांजाची तस्करी होत असल्याची माहिती नागपूर शहर गुन्हे शाखा आणि लोहमार्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हेशाखेला मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार नागपूर शहर गुन्हे शाखेचे निरीक्षक पंडित सोनवणे, लोहमार्ग पोलीस स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक नितीनचंद्र राजकुमार, अनुप अढाऊ, प्रवीण राठोड, अशोक हनवते, रवींद्र सावजी, बाबुसिंग ठाकूर, संतोष चौबे, नरेंद्र चौधरी, मुश्ताक शेख, हवालदार गणेश लढे, गजानन ठाकूर, शैलेश ठवरे, बच्चू तिवारी, प्रकाश सिडाम, नितीन रांगणे, सतीश पाटील, किशोर महंत, प्रफुल्ल बोंद्रे, सय्यद वाहिद, दत्ता घुगल यांनी सापळा रचला. पुरी-अहमदाबाद एक्स्प्रेस दुपारी २.५० वाजता प्लॅटफार्म क्रमांक ३ वर येताच या गाडीतील आरोपींना त्यांनी मुद्देमालासह ताब्यात घेतले. सुकेश वेणुधर महाराणा (२०) रा. राजस जि. खुर्दा (ओडिशा), प्रशांत कुमार बाउरी बंधूमहापात्रा (२२) रा. कदवा, जि. पुरी (ओडिशा) आणि प्रमोद महेंद्र बागरसिंग (२२) रा. घोगोपुर जि. खुर्दा असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडुन १०० किलो १०९ ग्रॅम वजनाचा आणि १० लाख ९ हजार १०० रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)