चक्क विमानातून पार्सलद्वारे १० किलो गांजाची तस्करी

By योगेश पांडे | Updated: May 4, 2025 16:08 IST2025-05-04T16:08:42+5:302025-05-04T16:08:54+5:30

विमानतळावर तपासणीदरम्यान हा प्रकार उघडकीस आला

10 kg of marijuana smuggled through parcel from plane | चक्क विमानातून पार्सलद्वारे १० किलो गांजाची तस्करी

चक्क विमानातून पार्सलद्वारे १० किलो गांजाची तस्करी

नागपूर : विमानातून पार्सलद्वारे चक्क १० किलो वजनाच्या गांजाची तस्करी करण्यात आली. विमानतळावर तपासणीदरम्यान हा प्रकार उघडकीस आला. ओडिशा येथून हे पार्सल पाठविण्यात आले होते. सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी रात्री ही घटना घडली असून यामुळे खळबळ उडाली आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमातळावरून दररोज देशविदेशात पार्सल पाठविण्यात येतात. या पार्सल्सचे नियमितपणे स्क्रिनींग करण्यात येते. शनिवारी रात्री पावणेअकरा वाजता कार्गो विभागातील डोमेस्टिक स्क्रिनिंग मशीन क्रमांक एक येथे पार्सलची तपासणी सुरू होती. एका खाकी रंगाच्या खर्ड्याच्या डब्यातील पार्सलमधून उग्र वास येत होता. त्याची तपासणी केली असता काळ्या, लाल व पिवळ्या रंगाच्या रेक्झिनच्या पिशवीत हिरव्या रंगाचा गांजा आढळला. त्याचे वजन १०.२८ किलो इतके होते. कार्गो एक्सटेंशन भागातील सुरक्षा प्रबंधक अधिकाऱ्यांनी याची माहिती सोनेगाव पोलीस ठाण्याला दिली. पोलिसांनी तेथून २ लाख रुपये किंमतीचा गांजा जप्त केला. संबंधित पार्सलची डिलिव्हरी ओडिसा येथील राहुल फिटनेस, छपाडिया, इंद्रा चौक, कांताबनजी येथून आल्याचे स्टीकर लागले होते. पोलिसांनी या प्रकरणात एनडीपीएस ॲक्टअंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Web Title: 10 kg of marijuana smuggled through parcel from plane