शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

Social Media: सोशल मीडियावर मुलीच सैराट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2022 12:22 IST

Social Media:शैक्षणिक धोरण आणि शिकवण्याच्या पद्धती यात काळानुरूप बदल केले जातात. इंटरनेटच्या शोधानंतर हळूहळू ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले. कालांतराने मुलांच्या शालेय शिक्षणातही त्याचा प्रभावीपणे वापर होऊ लागला.

- गणेश देवकर(मुख्य उपसंपादक)शैक्षणिक धोरण आणि शिकवण्याच्या पद्धती यात काळानुरूप बदल केले जातात. इंटरनेटच्या शोधानंतर हळूहळू ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले. कालांतराने मुलांच्या शालेय शिक्षणातही त्याचा प्रभावीपणे वापर होऊ लागला. कोरोना कालखंडात तर ऑनलाइन शिक्षण हा कळीचा मुद्दा बनला होता. या पार्श्वभूमीवर एकूणच सोशल मीडिया, त्याचा किशोरवयीन मुलांकडून होत असलेला वापर आणि त्यामुळे त्यांच्या सवयी आणि वर्तनात झालेला बदल याचा अभ्यास पीव्ह रिसर्च सेंटरने यावर्षी केला. त्यातून समोर आलेल्या निष्कर्षांची २०१४-१५ मध्ये केलेल्या सर्व्हेशी तुलना केली असता, विस्मयकारी गोष्टी समोर आल्या आहेत. मुलींना आवडे टिकटॉक, मुले यूट्युबच्या प्रेमातसर्व्हेमध्ये सामील असलेल्या मुलांमध्ये किशोरवयीनांमध्ये ऑनलाइन असणाऱ्यांमध्ये मुलींचे प्रमाण मुलांपेक्षा अधिक असल्याचे दिसून आले आहे. या वयोगटातील मुलींच्या तुलनेत मुलांना यूट्युब अधिक पसंत आहे. त्याखालोखाल मुलांना ट्विच, रेडिड आवडते.  तर मुलींना मुलांपेक्षा टिकटॉक जवळचे वाटते. त्याखालोखाल मुलींची पसंती इन्स्टाग्राम आणि स्नॅपचॅटला आहे. 

५४% युजर्सना वाटते की ही सवय सुटणे केवळ अशक्य आहे. केवळ अशक्य आहे असे वाटणाऱ्यांमध्ये मुलींचे प्रमाण मुलांपेक्षा ४टक्के अधिक आहे. उर्वरित ४६% जणांमध्ये वाटते की ही सवय सुटू शकते. त्यातील ५१ टक्के मुलांना हे अगदी सोपे वाटते तर सोपे वाटणाऱ्या मुलींचे प्रमाण ४६% इतके आहे.

सतत ऑनलाइन असणे योग्य? ५५%युजर्सना वाटते हे योग्य आहे. ३६%युजर्सना वाटते की हा वेळ खूप अधिक आहे. ८% युजर्सना वाटते की हा वेळच फार कमी आहे.हा वेळ चुकीच्या कामासाठी वापरला जातो असे कुणालाच वाटत नाही. 

पीव्ह रिसर्च सेंटरने केलेला सर्व्हेकालावधी १४ एप्रिल ते ४ मे २०२२  एकूण सहभागी - १,३१६   वयोगट - १३ ते १७

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्रामWomenमहिला