शहरं
Join us  
Trending Stories
1
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
2
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
3
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
4
नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे
5
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
6
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
7
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
8
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
9
Travel : लडाखमध्ये इंजिन बंद असूनही गाड्या आपोआप चढतात डोंगर; या 'मॅग्नेटिक हिल'चं रहस्य काय?
10
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
11
भयंकर! फक्त एका लिंबूसाठी १२ वर्षांच्या मुलाची हत्या; संतप्त जमावाकडून पोलिसांवर दगडफेक
12
PM मोदी म्हणाले, १ वर्ष सोनं खरेदी करू नका; पण चांदीबद्दल काहीच का नाही बोलले? दर वर्षी किती चांदी खरेदी करतो भारत?
13
Top Marathi News Live: नाशिक: भोंदू अशोक खरातविरुद्ध SITकडून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल
14
इराणचा 'डर्टी बॉम्ब'! एका स्फोटात शहरं होतील ओसाड; अमेरिकन नौदलाला हाय अलर्ट
15
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
16
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
17
वर्दीतील देवदूत! हायवेवर Heart Attack आलेल्या चालकाचे वाचवले प्राण; इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव
18
पती हरवल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आली; तपास सुरू झाला, समोर आले पत्नीचे दोन आशिक अन्.. 
19
“मनमानी भाडेवाढ करणारे खासगी बस वाहतूकदार, अवैध प्रवासी ॲपवर कारवाई करा”: प्रताप सरनाईक
20
Huma Praveen : २ मुलींची जबाबदारी, १० वर्षे नोकरी, ५ वर्षे अपयश; किचनमध्ये केला अभ्यास, सून झाली ऑफिसर
Daily Top 2Weekly Top 5

जीवनाची नवी दृष्टी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 06:05 IST

ज्या मदत आणि मार्गदर्शनाच्या आपण शोधात आहोत, नेमक्या त्याच दिशेनं नेताना आपल्याला आश्वासक वाट आणि दिशा दाखवणारं एक पुस्तक लेखिका मेघा दर्डा यांनी लिहिलं आहे. ‘क्रॅकिंग द फिअर ऑफ कोड’ या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्या भीतीवर मात कशी करायची हे त्यांनी अतिशय सोप्या, सहज शैलीत समजावून सांगितलं आहे. 

ठळक मुद्देअतिशय सुबक आणि प्रवाही भाषेत सांगितलेली कहाणी..

एका अतिशय आव्हानात्मक अशा काळात आपण जगत आहोत. गतीमान जीवनशैली, शिक्षण आणि करिअरमधली जीवघेणी स्पर्धा, छोट्या शहरातून मोठय़ा शहरात होणारं स्थलांतर. अशा अनेक गोष्टींशी सामना करीत असताना, कोणीतरी आपल्याला मार्गदर्शन, मदत करावी असं सारखं आपल्याला वाटत असतं. 
ज्या मदत आणि मार्गदर्शनाच्या आपण शोधात आहोत, नेमक्या त्याच दिशेनं नेताना आपल्याला आश्वासक वाट आणि दिशा दाखवणारं एक पुस्तक लेखिका मेघा दर्डा यांनी लिहिलं आहे. ‘क्रॅकिंग द फिअर ऑफ कोड’ या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्या भीतीवर मात कशी करायची हे त्यांनी अतिशय सोप्या, सहज शैलीत समजावून सांगितलं आहे. 
एका लहान गावातल्या मुलीचा चित्तवेधक प्रवास म्हणजे हे पुस्तक. ही मुलगी गावातून महानगरात जाते, तिथे गेल्यावर स्वत:च्या पायावर उभं राहण्यासाठी नोकरी मिळवण्यापासून ते आजपर्यंत अपरिचित असलेल्या जगात स्वत:ची ओळख निर्माण करण्यापर्यंत  अनेक आव्हानांना तोंड देते. 
कथानायिका अनुराधा भीतीवर मात करत आपले ध्येय कसे साध्य करते, बदल स्वीकारत, विश्वास व्यवस्था बदलत कशी पुढे जाते हा प्रवास लेखिका एका कथेच्या माध्यमातून आपल्यापुढे मांडते.
अनेकदा आपल्याला न आवडणार्‍या नोकरीमध्ये आपण चिटकून राहतो, नकोशा नातेसंबंधांत अडकून पडतो, याचं कारण पर्याय नसल्याची भीती! भयाचं हेच बंधन आपल्याला कैदेत अडकवून ठेवतं. 
हीच भीती आपल्या आशेवर पाणी फेरते आपली स्वप्नं उद्ध्वस्त करते. मात्र भीतीवर मात करायची असेल, तर आपल्या विश्वास प्रणालीचा आपण पुनर्विचार केला पाहिजे, हे लेखिका प्रभावीपणे सांगते. त्यामुळे भीती हा एक अडथळा न राहता, स्व-जाणीव आणि नातेसंबंधांतील प्रगतीची ती पायवाट ठरते. 
वर्तणूक चिकित्सक, मानसिक बदलांच्या अभ्यासक आणि मार्गदर्शक असलेल्या लेखिकेने अतिशय सुबक आणि प्रवाही भाषेत सांगितलेली ही कहाणी जणू वाचकांचीच कहाणी आहे. त्यामुळे वाचकाला बांधून ठेवतानाच जीवनाची नवी दृष्टी हे पुस्तक देते. 
क्रॅकिंग द फिअर ऑफ कोड- मेघा दर्डा
प्रकाशक- पेनमॅन बुक्स डॉट कॉम
पाने- 122, किंमत- 499 रुपये