शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

"मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - Hello, Is it PMO?; पंतप्रधान 'डू नॉट डिस्टर्ब मोड'वर आहेत, नंतर कॉल करा"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2021 20:07 IST

राज्यात रुग्णांसाठी बेड आणि ऑक्सिजनचीही कमतरता भासू लागली आहे. यापार्श्वबूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मदतीची मागणीही केली आहे.

मुंबई - संपूर्ण देशात कोरोनाने थैमान घातले आहे. महाराष्ट्राला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसत आहे. राज्यात रुग्णांसाठी बेड आणि ऑक्सिजनचीही कमतरता भासू लागली आहे. यापार्श्वबूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मदतीची मागणीही केली आहे. एका स्थानिक वृत्त वाहिनीने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या 24 तासांत पंतप्रधान मोदींना तीनवेळा फोन केला. मात्र, त्यांचा प्रत्यक्ष संपर्क होऊ शकला नाही. यानंतर आता युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी एक ट्विट करत, पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारवर उपरोधिक निशाणा साधला आहे. (Youth Congress leader satyajeet tambe on central government over remdesivir and oxygen supply to maharashtra)

देश सोडून चिनी कोरोना लस घेण्यासाठी नेपाळमध्ये का जातायत लोक? उत्तर वाचून व्हाल अवाक!

काय आहे सत्यजीत तांबेंचं ट्विट - सत्यजीत तांबे यांनी आपल्या ट्विटमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान कार्यालयादरम्यानचा काल्पनिक संवाद मांडत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. या ट्विट मध्ये, "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान कार्यालयाला फोन लावतात आणि म्हणतात, की महाराष्ट्राला ऑक्सिजन आणि रेमडेसिव्हीरच्या पुरवठ्यासंदर्भात मला नरेंद्र मोदी यांच्याशी तातडीने बोलायचे आहे. यावर पंतप्रधान कार्यालयाकडून, सर, पंतप्रधान सध्या 'डू नॉट डिस्टर्ब मोड'वर आहेत, असे उत्तर येते. यानंतर उद्धव ठाकरे विचारतात, की पंतप्रधान केव्हा उपलब्ध होतील, यावर, 2 मेनंतर सर्व राज्यांच्या निवडणुका संपल्या की उपलब्ध होतील, असे उत्तर पंतप्रधान कार्यालयाकडून मिळते." 

CoronaVirus: आता घरो-घरी जाऊन लसीकरण करण्याची तयारी, 45 वर्षांखालील लोकांनाही मिळू शकते कोरोना लस!

CoronaVirus Update: धक्कादायक! आरटी-पीसीआर टेस्टनंही डिटेक्ट होईना कोरोना, करावे लागतेय सीटी स्कॅन; लोकांचा दावा

ऑक्सीजनची कमतरता -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून, 30 एप्रिलपर्यंत महाराष्ट्रात कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या 11.9 लाखांवर जाईल आणि ऑक्सीजनची मागणी 200 मेट्रिक टनवर पोहोचेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. सध्या महाराष्ट्रात 1200 मेट्रिक टन ऑक्सीजनचे उत्पादन होते. मात्र, मागणी 1300 ते 1500 मेट्रिक टन ऑक्सीजनची आहे.

मुख्यमंत्र्यांचं उद्योजकांना आवाहन -कोविडचा वाढता प्रादुर्भाव पाहता सध्याच्या परिस्थितीत ऑक्सिजनची नितांत आवश्यकता आहे. याशिवाय उद्योगांनी औषधे, बेड्स सुविधा उपलब्ध करणे, चाचणी केंद्रे वाढविणे आणि लसीकरणाला वेग देण्याबरोबरच, या लढाईत राज्य सरकारला शक्य ती सर्व प्रकारची मदत करावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज उद्योगांना केले. कोविडची तिसरी लाट आल्यास उद्योग- व्यवसायांचे नुकसान होऊ नये आणि अर्थचक्रालादेखील झळ बसू नये, यासाठी उद्योगांनी आत्तापासूनच कोविड सुसंगत कार्यपद्धतीचे नियोजन करून तशा सुविधा उभाराव्यात व कार्यप्रणाली अवलंबावी असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे. यावर प्रतिसाद देतांना कोविडविरुद्धच्या लढाईत संपूर्ण उद्योग विश्व आपल्याबरोबर आहे, असा एकमुखाने विश्वास राज्यातील प्रमुख उद्योगपतींनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे.

CoronaVirus: चिंताजनक! हवेच्या माध्यमाने वेगाने पसरतो कोरोना; ठोस पुराव्यांसह Lancet चा दावा...!

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस