शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

योगा, जॉगिंग ठेवते फिट

By admin | Updated: October 11, 2014 06:16 IST

राजकीय व्यक्तींचे जीवन तसे धावपळीचे़ आणि निवडणुकीच्या काळात ही धावपळ कैकपटीने वाढत असते़ कडक उन्हातून घरोघरी प्रचार,

शेफाली परब-पंडित, मुंबईराजकीय व्यक्तींचे जीवन तसे धावपळीचे़ आणि निवडणुकीच्या काळात ही धावपळ कैकपटीने वाढत असते़ कडक उन्हातून घरोघरी प्रचार, बैठका, पदयात्रा आणि सभा. यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही उमेदवारांची अशीच धावपळ सुरू आहे़ दिंडोशी मतदारसंघातील काँग्रेस आणि पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार राजहंस सिंह यांची ‘लोकमत’ने टिपलेली ही धावपऴ़़राजहंस सिंह यांचा दिनक्रम सकाळी ६ वाजता सुरू होतो़ घरोघरी जाऊन प्रचार करण्यावरच त्यांनी भर दिला आहे़ पण उन्हातान्हातून फिरण्यासाठी फिट राहणे आवश्यक असल्याने सकाळी उठल्यानंतर ते नियमित योगा आणि जॉगिंग करतात़ नऊपासून त्यांच्या प्रचारफेरीला सुरुवात होते़ आपल्या मतदारसंघातील एका विभागापासून त्यांची पदयात्रा सुरू होते़ नागरिकांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या समस्या जाणून घेतात़ त्या समस्यांची नोंद घेण्यासाठी त्यांनी सचिवालाही बरोबर घेतलेले असते़ निवडून आल्यानंतर या नोंदवहीतील समस्यांवर प्राधान्याने तोडगा काढण्यात येईल, असे राजहंस सिंह सांगतात़रणरणत्या उन्हात घामाच्या धारा वाहत असतात़ तरीही पहिल्या टप्प्यातील ही प्रचारफेरी पूर्ण करूनच ते साडेबाराच्या सुमारास आपल्या कार्यालयात परतात़ कार्यकर्त्यांची फौज तेथे हजर असतेच़मध्येच एखादी झोप घेतल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील प्रचारासाठी ते सज्ज होतात़ प्रचाराला कमी दिवस उरल्यामुळे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न उमेदवार करीत आहेत़ अशा वेळी आरोग्य सांभाळणे महत्त्वाचे़ म्हणून राजहंस सिंह यांनी पौष्टिक आहार घेतात. घरी तयार केलेले अन्न हे सर्वात बेस्ट़ दोन चपात्या, डाळ, भात, भाजी हा साधा आहारच त्यांना फिट ठेवत आहे़ जाहीर सभा संपेपर्यंत रात्र सरत असते़ तरीही आरोग्याची हेळसांड न करता योग्य आहार ते घेतात़