शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

"जरांगेंच्या निर्णयामुळे कार्यकर्त्यांचं नुकसान; ...आम्ही व्यवस्थित डाव मारू!"; काय म्हणाले बच्चू कडू?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 13:48 IST

जरांगे यांच्या निवडणूक न लढवण्याच्या घोषणेसंदर्भात बोलताना बच्चू कडू म्हणाले, "खरे तर तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण जो काही निर्णय घेतला, त्याला फार उशिरा केला."

मनोज जरांगे यांनी जो काही निर्णय घेतला आहे (निवडणूक न लढवण्याचा) त्याला फार उशिरा केला. एक तर कार्यकर्त्यांना अर्ज भरायला लावणे, ४ तारखेला आम्ही लिस्ट जाहीर करतो, असे सांगणे, नंतर पुन्हा दुसरी तारीख देणे, यामुळे कार्यकर्त्यांचे आर्थिक नुकसान झाले. हे कार्यकर्त्यांनीही बोलवून दाखवले आहे. असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. याशिवाय, निवडणुकीनंतर, सर्वांमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी रस्सीखेच होईल आणि अशा परिस्थितीत आम्ही व्यवस्थित डाव मारू," असा विशअवासही बच्चू कडू यांनी व्यक्त केला आहे. ते अमरावतीत माध्यमांसोबत बोलत होते.  जरांगे यांच्या निवडणूक न लढवण्याच्या घोषणेसंदर्भात बोलताना बच्चू कडू म्हणाले, "खरे तर तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण जो काही निर्णय घेतला, त्याला फार उशिरा केला. एक तर कार्यकर्त्यांना अर्ज भरायला लावणे. ४ तारखेला आम्ही लिस्ट जाहीर करतो, नंतर पुन्हा दुसरी तारीख देणे, यामुळे कार्यकर्त्यांचे आर्थिक नुकसान झाले. हे कार्यकर्त्यांनी बोलवूनही दाखवले. एक तर आपण सांगायला हवे होते की, निवडणूक लढणार नाही. आता तुम्ही निवडणुकीचे २५ टक्के, ५० टक्के पार्ट झाल्यानंतर सांगत आहात की आता नाही लढत. यात ज्या कार्यकर्त्यांनी इकडून तिकडून पैसे आणून खर्च केला होता, त्याला आर्थिक झळ बसली आहे. 

कडू म्हणाले, "त्यांची (जरांगे) एक गोष्ट मान्य आहे की, एका जातीवर निवडणूक होत नाही आणि एका जातीवर निवडणूक करण्याचा कुणी प्रयत्नही करू नये. कारण देशात जात आणि धर्म आणि पैसा या सगळ्या गोष्टींना दूर ठेवून राजकीय पक्षांना राजकारण करता येत नाही. ही सर्वात मोठी कमजोरी आहे. मात्र सगळे पक्ष धर्म, जात आणि पैसा सोडून जर उतरण्याची तयारी नसल्याने, संपूर्ण देशावर त्याचा मोठा परिणाम होत आहे." 

"लोक मूळ मुद्द्यांऐवजी नको ते मुद्दे बाहेर आणल्याने, आज अतिशय वाईट स्थिती देशात आहे. तुम्ही जर पाहिले, तर रुग्णालयांचे काय हाल आहेत, शाळांचे काय हाल आहेत, शेतीमालाला भाव नाही. या अनेक गोष्टी आपण पाहिल्या, तर याचा प्रचंड रोष लोकांमध्ये आहे. परंतु आम्ही राजकीय लोकांनी जाती-धर्माच्या मुद्द्यावर यश मिळवले आहे. यामुळे मूळ मुद्द्यांपासून दूर जात आहोत," असेही कडू यांनी म्हटले आहे.

किती जागा लढवणार आणि भविष्यात महायुती अथवा महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याची वेळ आली तर आपले पर्याय खुले आहेत का? असे विचारले असता, कडू म्हणाले, "आम्ही ४० जागा आता महाशक्तीमध्ये लढणार आहोत. संपूर्ण महाशक्ती १२१ जागा लढते आहे आणि यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने काही जागेवर आम्ही विजय मिळवणार आहोत. आता राहिला प्रश्न पुढे काय करणार आहोत? तर मला वाटते आमचे सरकार बनेल. सगळ्यांची सांगड तुटेल. सगळ्यांमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी रस्सीखेच होईल आणि अशा परिस्थितीत आम्ही व्यवस्थित डाव मारू," असा विश्वासही बच्चू कडू यांनी यावेळी व्यक्त केला.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलBachhu Kaduबच्चू कडूElectionनिवडणूक 2024