शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

महिलांमध्ये बळावतोय हृदयविकाराचा धोका

By admin | Updated: September 29, 2014 07:38 IST

हृदयविकार हा प्रामुख्याने पुरुषांना आणि ज्येष्ठ नागरिकांना होणारा आजार असे समजले जात होते, मात्र गेल्या तीन वर्षांत केलेल्या सर्वेक्षणामध्ये असे आढळून आले

पूजा दामले, मुंबईहृदयविकार हा प्रामुख्याने पुरुषांना आणि ज्येष्ठ नागरिकांना होणारा आजार असे समजले जात होते, मात्र गेल्या तीन वर्षांत केलेल्या सर्वेक्षणामध्ये असे आढळून आले आहे की, ३५ वर्षांवरील महिलांनाही हृदयविकार होण्याचा धोका वाढलेला आहे. महिलांमध्ये हृदयविकार होण्याची कारणे त्यांच्या जीवनशैलीत असल्याचे दिसून आले आहे. भारतातील ५ पैकी ३ महिलांना हृदयविकाराचा धोका लवकरात लवकर म्हणजे वयाच्या ३५ वयापर्यंत निर्माण होताना दिसत आहे. तीन वर्षांपासून सुरू असलेल्या सर्वेक्षणामध्ये भारतातील १२ प्रमुख महानगरे आणि नगरांपैकी १ लाख ६० हजार लोकांचा समावेश केला होता. यापैकी ३२ टक्के महिला होत्या. ३२ टक्के महिलांपैकी ९२ टक्के महिलांचे वय ६० पेक्षा कमी होते. शहरी भागातील ५१ हजार ७०० महिलांमधून ५ पैकी ३ महिलांना हृदयविकाराचा धोका असल्याचे सर्वेक्षणात आढळले. अन्य शहरांच्या तुलनेत मुंबईतील महिलांमध्ये हृदयविकाराचा धोका असण्याचे सर्वाधिक म्हणजे ७० टक्के इतके प्रमाण आहे. या महिलांमध्ये ५३ टक्के महिलांमध्ये लठ्ठपणा, ५७ टक्के महिलांत चांगल्या कोलेस्ट्रॉलची कमतरता आढळून आली आहे.भारतात ३५ ते ४४ वयोगटातील महिलांना हृदयविकार होण्याचा धोका जास्त आहे. महिलांमध्ये बैठी जीवनशैली, तणावपूर्ण कामाची स्थिती यामुळेही हृदयविकाराचा धोका वाढताना दिसतो आहे. ३५ ते ४४ वयोगटातील महिलांना हृदयविकाराचा अधिक धोका आहे, यावर महिलांनी लक्ष दिले पाहिजे, असे एंडोक्रेनॉलॉजिस्ट प्रा. शशांक जोशी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)