शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
3
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
4
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
5
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
6
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
7
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
8
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
9
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
10
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
11
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
12
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
13
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
14
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
15
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
16
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
17
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
18
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
19
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
20
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
Daily Top 2Weekly Top 5

महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या विरोधकांचा आता मुखवटा फाडणार; मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 14:33 IST

महाराष्ट्रातून १ कोटी महिलांच्या सह्या विधेयकाच्या बाजूने जमा करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सांगितले. 

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महिला आरक्षणाला विरोध करून विरोधकांनी देशातील ७० कोटी महिलांचा विश्वासघात केला आहे. काँग्रेस, शरद पवार गट आणि उबाठाचा महिला विरोधी मुखवटा उघड करण्यासाठी महायुतीतील सगळे पक्ष एकत्रित येऊन जनआंदोलन करून महिलांमध्ये जनजागृती करतील. तसेच महाराष्ट्रातून १ कोटी महिलांच्या सह्या विधेयकाच्या बाजूने जमा करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सांगितले. 

मुंबईत घेतलेल्या महायुतीच्या पत्रकार परिषदेत फडणवीस म्हणाले की, या जनआंदोलनातून विरोधकांवर दबाव निर्माण केला जाईल आणि त्यांना या विधेयकाला समर्थन देण्यास भाग पाडले जाईल. १७ एप्रिल रोजी संसदेत जे घडले, तो देशाच्या इतिहासातील काळा दिवस आहे. जोपर्यंत लोकसभा आणि विधानसभेत महिलांना आरक्षण मिळत नाही, तोवर आम्ही स्वस्थ बसणार नाही. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, मंत्री पंकजा मुंडे, आदिती तटकरे, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उपस्थित होते.

खुल्या चर्चेचे आव्हान

विरोधी पक्षांकडे कुठलाही प्रतिवाद नाही. मी त्यांना खुले आव्हान देतो, माझ्या स्तरातल्या त्यांच्या कुठल्याही नेत्याने  माझ्यासोबत महिला विधेयकावर खुली चर्चा करावी, पण ते करणार नाहीत. केवळ मुजोरी करायची आणि पळून जायचे, अशी टीकाही मुख्यमंत्र्यांनी केली. दुर्दैवाने काँग्रेस, तृणमूल, डीएमके, उबाठा, शरद पवार गट, समाजवादी पार्टी अशा सगळ्या पक्षांनी आपल्या महिला विरोधी मानसिकतेचे प्रदर्शन केले. विरोधकांनी या विधेयकाची भ्रूणहत्या केली आणि आनंदोत्सव साजरा केला, तो एकप्रकारे समाजसुधारकांच्या विचारांवर केलेले तांडव होते, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली.

राहुल गांधी खोटारडेपणाच्या ऑलिम्पिक स्पर्धेतील विजेते

एखादी व्यक्ती किती खोटे बोलू शकते याच्या ऑलिम्पिक स्पर्धा झाल्या तर त्याचे सुवर्णपदक राहुल गांधींना मिळेल. हे विधेयक म्हणजे संविधानाने दिलेल्या संकेतांनुसारच होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महिला आरक्षणासाठी आग्रही होते. पण काँग्रेसने डॉ. बाबासाहेबांच्या विचाराशी प्रतारणा केली. त्यांनी साष्टांग दंडवत घालून महिलांची माफी मागितली पाहिजे, पण ते तसे करणार नाहीत, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत यावेळी नमूद केले.

विरोधक म्हणाले... कधी, कुठे यायचे ते सांगा

महिला आरक्षणाच्या नावाखाली भाजपाला मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मंजूर करून देशाचे तुकडे पाडायचे होते. सत्तेसाठी भाजपा कोणत्याही थराला जाऊ शकते, पण त्यांचा कुटील डाव काँग्रेससह सर्व विरोधकांनी हाणून पाडला, असे स्पष्ट करून मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेल्या खुल्या चर्चेला काँग्रेस तयार आहे, कधी व कुठे यायचे ते सांगा. पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही चर्चेला आणा, असे प्रतिआव्हान काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी दिले. खासदार शोभा बच्छाव म्हणाल्या की, तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी पंचायत राज विधेयक आणून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण दिले, सोनिया गांधी यांनी त्यापुढे जात ते ५० टक्क्यांपर्यंत वाढवले. यासाठी काँग्रेसने कोणत्याही अटी टाकल्या नव्हत्या. मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षणचा संबध काय? ५४३ सदस्यांमध्ये महिला आरक्षण द्या. आम्ही त्याचा विरोध कधीच करणार नाही. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत या विषयाच्या संदर्भात चर्चा करायला तयार आहे. त्यांनी जागा सांगावी आणि वेळ सांगावी, असे सांगत शरद पवार गटाच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनीही फडणवीसांचे आव्हान स्वीकारले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Fadnavis slams opposition for opposing women's reservation, vows awareness.

Web Summary : Fadnavis accuses opposition of betraying women on reservation. He pledges a mass movement to expose their hypocrisy and gather support for the bill, challenging them to an open debate. Opposition leaders refute claims, asserting readiness for discussion anytime, anywhere.
टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPoliticsराजकारणMaharashtraमहाराष्ट्र