शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, पवारांचंही नाव घेतलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2024 12:50 IST

Maharashtra Assembly Election 2024 : आज (रविवार) मुंबईमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थित भाजपने आपले संकल्प पत्र अर्थात निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला. यात अनेक मोठ्या मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. याच वेळी, महाराष्ट्रात महायुतीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण होणार? या अनेकांच्या मात असलेल्या प्रश्नावरही खुद्द अमित शाह यांनी भाष्य केले आहे. 

सध्या राज्यात (महाराष्ट्रात) विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून जबरदस्त प्रचार सुरू आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी, सत्तेत आल्यानंतर आपण काय करणार? यासंदर्भात सर्वच राजकीय पक्ष मोठ मोठ्या घोषणा करताना दिसत आहेत. आपापले जाहीरनामे प्रसिद्ध करून आश्वासने देताना दिसत आहेत. यातच आज (रविवार) मुंबईमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थित भाजपने आपले संकल्प पत्र अर्थात निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला. यात अनेक मोठ्या मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. याच वेळी, महाराष्ट्रात महायुतीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण होणार? या अनेकांच्या मात असलेल्या प्रश्नावरही खुद्द अमित शाह यांनी भाष्य केले आहे.  महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आल्यास मुख्यमंत्री कोण होणार? यासंदर्भात बोलताना केंद्रीय गृहमंत्री तथा भाजप नेते अमित शाह म्हणाले, "सध्या महाराष्ट्रात युती सरकारचे नेतृत्व एकनाथ शिंदे हे करत आहेत. ते आमचे मुख्यमंत्री आहेत आणि निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण होणार, यासंदर्भात तीनही पक्ष एकत्र बसून निर्णय घेतील." एवढेच नाही तर, आम्ही शरद पवारांना कुठलीही संधी देणार नाही," असेही शाह यांनी म्हटले आहे.

भाजपच्या संकल्पपत्रात काय? बघा संपूर्ण लिस्ट -- लाडक्या बहिणींना पुढील काळात १५०० ऐवजी २१०० रुपये देणार- शेतकऱ्यांसाठी भावान्तर योजना (हमीभावाने खरेदी होणार नाही, त्याठिकाणी फरकाची रक्कम खात्यात टाकणार)- शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार- प्रत्येक गरिबाला अन्न आणि निवाऱ्याचा हक्क- वृद्धांची पेन्शन २१०० (सहायतेच्या योजनांमध्ये वाढ करणार)- जीवनावश्यक वस्तुंचे भाव स्थिर ठेवणार- २५ लाख रोजगारांची निर्मिती - १० लाख विद्यार्थ्यांना वेतन- गरीब आणि मध्यमवर्गीयांसाठी सौरचा वापर करुन ३० टक्के कमी करणार-विज्ञान तंत्रज्ञान : मेक इन महाराष्ट्राला प्रभावीपणे राबवणार- महाराष्ट्राला फिनटेक आणि एआयचं हब करू- एअरोनॉटिकल आणि स्पेसमध्ये उत्पादनावर काम करू- अक्षय अन्न योजना- महारथी : एआय लॅब्स- कौशल्य जनगणना करणार - छत्रपती शिवाजी महाराज आकांक्षा केंद्र- हमी भावापेक्षा कमी भावात खरेदी करत असेल तर भावात्तम रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात टाकणार- अडीच वर्षांमध्ये १ लाखापेक्षा जास्त सरकारी नोकऱ्या दिल्या.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Amit Shahअमित शाहBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस