शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
3
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
4
'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
5
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
6
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
7
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
8
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
9
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
10
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
11
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
12
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
13
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
14
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
15
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
16
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
17
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
18
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
19
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
20
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

"...तेव्हा तर विरोधकांचे चेहरी बघण्यासारखे होते, एकदम पांढरेफटक"; CM शिंदेंचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2024 23:08 IST

...पण सरकारची कामगिरी पाहून विरोधकांचे चेहरे मात्र पडले आहेत, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.

विरोधकांनी किती आटापिटा केला, सरकार स्थापन झाल्यापासून (महायुती सरकार) सरकार पडेल, सरकार पडेल, मात्र सरकार काही पडले नाही. पण सरकारची कामगिरी पाहून विरोधकांचे चेहरे मात्र पडले आहेत, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. ते मुंबई येथील षण्मुखानंद सभागृहात शासकीय योजना व अंमलबजावणीसंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय महायुती पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते.

महायुतीच्या पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधताना शिंदे यांनी विरोधकांना जोरदार टोला लगावला. ते म्हणाले, "आपण परवा ज्या कल्याणकारी योजना जाहीर केल्या. त्या बघून तर विरोधकांचे चेहरी बघण्यासारखे होते. एकदम पांढरे फटक झाले होते. काय करायचं? काय बोलायचं? काय टीका करायची? हेच त्यांना सुचत नव्हतं. त्यांना हे सर्व अनपेक्षित होतं." एवढेच नाही तर, "आम्ही तिघांनी ठरवलं होतं, एक मोठा बॉम्ब... म्हणजे योजनांचा... योजनांचा निर्णय घ्यायचा," असेही शिंदे यांनी यावेळी सांगितले.

"...आता राज्याचे भविष्यही उज्वल करण्याचा ध्यास" -कायकर्त्यांसोबत संवाद साधताना शिंदे म्हणाले, "राज्याचे वर्तमान सुधारले आहे. आता भविष्यही उज्वल करण्याचा ध्यास आपण घेतला आहे. आपण सर्व जण येथे उपस्थित आहात. आपण आपल्या सरकारची ताकद आहात. म्हणून महायुतीची एकजूट मजबुतीने पुढे न्यायला हवी. आता एकजूट महत्वाची आहे. ती दाखवण्याचा प्रयत्न आपण करायला हवा. हे सरकार काम करणारे आहे, हे लोकांनीही मान्य केले आहे. एवढेच नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही यावर शिक्कामोर्तब केले आहे. ही आपल्यासाठी मोठी, अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे," असेही शिंदे म्हणाले.

 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेMahayutiमहायुतीShiv SenaशिवसेनाBJPभाजपाAjit Pawarअजित पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस