शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

मोकाट कुत्र्यांना आवरा

By admin | Updated: August 5, 2016 01:00 IST

महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवसेनेने गुरुवारी (दि. ४) सहायक आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला.

हडपसर : काळेपडळ येथे डुकरांचा व कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून, त्याकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवसेनेने गुरुवारी (दि. ४) सहायक आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चातील आक्रमक पदाधिकाऱ्यांनी रुद्रावतार धारण केल्याने अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली. दोन्ही पक्षांच्या आंदोलनामुळे सहायक आयुक्त कार्यालयात मोठी गर्दी झाली होती. आंदोलकांनी प्राण्यांच्या छायाचित्राची प्रतिमा व कुत्र्याचे पिलू अधिकाऱ्यांना भेट दिले. या समस्येबाबत महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार मागणी करूनही येथे कारवाई होत नसल्याने मनसेच्या हडपसर महिला शहराध्यक्षा कल्पना जाधव, विभागाध्यक्ष साईनाथ बाबर, उपाध्यक्ष अजय न्हावले, विभागाध्यक्षा सुहासिनी कामठे, पूनम भुमकर, मंदा शेडगे, विशाखा गायकवाड, उपाध्यक्ष विशाल ढोरे, आबा धारवडकर, विनोद धुमाळ, अनिल म्हेत्रे, उपविभागाध्यक्षा सविता मोरे, प्रतीक्षा जाधव यांच्या नेतृत्वाखाली हडपसर सहायक आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.सहायक आयुक्त सुनील गायकवाड, वैद्यकीय अधिकारी, डॉ. दिनेश भेंडे यांना आंदोलकांनी प्रश्नांचा भडिमार केला. ‘कारवाई करायचे नाटक नको, प्रत्यक्षात कारवाई करा, नाही तर खुर्च्या खाली करा,’ असा संतप्त इशारा दिल्यावर वराहपालन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, वराह अन्यत्र हलविण्यात येतील, नागरिकांची या प्रश्नातून सुटका करण्यात येईल, अशी माहिती गायकवाड यांनी दिली. वराहपालन करणाऱ्या विरोधात कारवाई करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्याने आंदोलकांनी आंदोलन मोगे घेतले. आंदोलनाचे नेतृत्व अजय न्हावले व इंद्रायणी न्हावले यांनी केले होते. (वार्ताहर)>काळेपडळ व हडपसर परिसरातील अनेक ठिकाणी डुकरांचा सुळसुळाट वाढला असून त्याबाबत त्यांना दिलेल्या नियोजित जागांवर हे वराह हलवावेत. येत्या काळात पालिकेच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली नाही, तर हडपसर सहायक आयुक्त कार्यालय बंद करू. - अजय न्हावले, मनसे उपाध्यक्ष, हडपसर