शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

वेबसाईटवर अधिका-यांच्या पदांचे ‘तीनतेरा’

By admin | Updated: January 17, 2015 05:53 IST

एसटीत भविष्यात मोठे बदल घडवून आणण्याचे उद्दिष्ट ठेवणाऱ्या महामंडळाने आपल्या वेबसाईटकडे मात्र दुर्लक्ष केल्याचे समोर आले आहे

मुंबई : एसटीत भविष्यात मोठे बदल घडवून आणण्याचे उद्दिष्ट ठेवणाऱ्या महामंडळाने आपल्या वेबसाईटकडे मात्र दुर्लक्ष केल्याचे समोर आले आहे. एसटी महामंडळाच्या वेबसाईटवर सध्या कार्यरत असलेल्या आणि नवीन पदे असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची जुनीच पदे दाखवण्यात येत आहेत. त्यामुळे एकूणच या वेबसाईटवर अधिकाऱ्यांच्या पदांचेच तीनतेरा वाजवण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. एसटी महामंडळ हायटेक होण्याच्या दृष्टीने पाऊल टाकत असून, गाड्यांमध्ये मोठे बदल करण्यात येत आहेत. त्याचबरोबर प्रवाशांना सहजतेने तिकीट उपलब्ध व्हावे यासाठीही प्रयत्न केले जात आहेत. यासाठी एसटीच्या वेबसाईटवरही बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यावर कामही सुरू आहे. मात्र असे असतानाच हायटेक होण्याचे उद्दिष्ट ठेवणाऱ्या महामंडळाने आपल्या वेबसाईटकडे दुर्लक्षच केले आहे. एसटीच्या वेबसाईटवर अनेक प्रकारची माहिती देण्यात आली असून, अधिकाऱ्यांची नावे, पदे आणि त्यांच्या फोन नंबरचाही समावेश आहे. मात्र अधिकाऱ्यांच्या पदांचे या वेबसाईटवरच तीनतेरा वाजवण्यात आले आहेत. गेल्या काही महिन्यांत अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून, त्यांची पदे बदलली गेली आहेत. असे असतानाही सध्या नवीन पदे भूषवित असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची एसटीच्या वेबसाईटवर जुनीच पदे दाखविण्यात आली आहेत. व्ही.व्ही. रत्नपारखी हे सध्या वाहतूक महाव्यवस्थापकपदी असून, वेबसाईटवर नियोजन आणि पणनचे उपमहाव्यवस्थापक म्हणून दाखवण्यात आले आहे. तर सु.म. अंबाडेकर हे आता नियोजन आणि पणनचे महाव्यवस्थापक असून, वेबसाईटवर अजूनही वाहतूक विभागाचे महाव्यस्थापक म्हणून दाखवण्यात आले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे राजेंद्र पाटील यांचे पद वेबसाईटवर भांडार आणि खरेदीचे महाव्यवस्थापक म्हणून दाखवण्यात आले आहे. मुळात पाटील हे ३१ डिसेंबर रोजी निवृत्त झाले आहेत. या पदावर आर.आर. पाटील कार्यरत आहेत. मात्र आर.आर. पाटील यांचे वेबसाईटवर पद अजूनही कर्मचारी वर्ग आणि औद्योगिक संबंध म्हणून दाखवण्यात आल्याने महामंडळाचा एकूणच सावळागोंधळाचा कारभार उघड झाला आहे. (प्रतिनिधी)