शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Pune Expressway Missing Linkवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार?
2
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
3
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
4
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
5
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
6
Video: कढई हेल्मेट..!! बाईकवरून जाताना पोलिसांना चकवण्यासाठी तरूणाने केला भन्नाट जुगाड
7
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
8
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
9
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
10
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
11
मुख्यमंत्री वैद्यकीय निधी ठरतोय रुग्णांचा ‘आधार’, उपनगरात ८६९ रुग्णांना ८.१० कोटींची मदत
12
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
13
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
14
Mumbai RTO News: आरटीओच्या सेवा ऑनलाइन; तरीही कार्यालयांमध्ये हेलपाटे
15
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
16
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
17
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
18
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
19
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
20
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 06:26 IST

जनसुरक्षा विधेयकावर विरोधकांनी अवस्था सहनही होत नाही, सांगताही येत नाही अशी झाली आहे. संयुक्त चिकित्सा समितीत त्यांचाही समावेश होता. तेव्हा अंतिम मसुदा त्यांच्याच सहमतीने मंजूर केला गेला. - फडणवीस

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन आम्ही दिले होते ते पूर्ण करणारच. पण कर्जमाफी हा तत्कालिक उपाय आहे. कोणतेच राज्य दर पाच वर्षांनी कर्जमाफी देऊ शकत नाही. पण आम्ही शेतकऱ्यांसाठी कधीही हात आखडता घेतलेला नाही. शेतकऱ्यांचे जीवन सुखाचे व्हावे, त्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना कराव्या लागतील. त्याच्याच शिफारशी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन समिती स्थापन केली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, मंत्री शंभूराज देसाई उपस्थित होते.

जनसुरक्षा विधेयकावर विरोधकांनी अवस्था सहनही होत नाही, सांगताही येत नाही अशी झाली आहे. संयुक्त चिकित्सा समितीत त्यांचाही समावेश होता. तेव्हा अंतिम मसुदा त्यांच्याच सहमतीने मंजूर केला गेला. मसुद्यात काहीच आक्षेपार्ह नसल्याने त्यांनी तेव्हा कोणताच विरोध केला नाही आता मात्र कोणाचा तरी दबाव आल्याने त्यांनी वेगळी भूमिका घेतल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

 विधिमंडळ सदस्यांकडून निश्चितच चांगल्या वर्तनाची अपेक्षा आहे. गोपीचंद पडळकर जेव्हा अजितदादांविरोधात बोलले तेव्हा मी त्यांना समज दिली. शरद पवार यांच्याबद्दल चुकीचे बोलले तेव्हा मी दिलगिरी व्यक्त केली होती. पण नेहमी पडळकरच का दिसतात? दुसरे का दिसत नाहीत? दुसरे जेव्हा असे वागतात तेव्हा त्यांचे आका कोण हे शोधून काढले पाहिजे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

विरोधक उदासीनच : अजित पवारअधिवेशनानिमित्त विरोधकांना छाप पाडण्याची संधी होती, ती त्यांना पाडता आली नाही. त्यातून विरोधकांची अधिवेशनाबबत उदासीनता पहायला मिळाली, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.आजपर्यंतच्या विधिमंडळाच्या इतिहासात एवढ्या लक्षवेधी कधी झाल्या नाहीत. एका दिवशी २५-२५ लक्षवेधी आणि ११-११ अर्धा तासाच्या चर्चा  लागल्या होत्या. रात्री ३ वाजता आमच्याकडे ललक्षवेधी यायच्या, त्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना माहितीसाठी फोन लावायचा म्हटले तर ते झोपलेले असायचे, त्यामुळे मंत्र्यांची पंचाईत व्हायची असेही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी टोचले मंत्र्यांचे कानलाडकी बहीण योजनेबाबत काही मंत्र्यांची वेगवेगळी विधाने येत असतात. मंत्र्यांच्या बोलण्याच्या अधिकारावर तर मी बंदी आणू शकत नाही, मात्र मंत्र्यांनी सदसदविवेकबुद्धीने बोलावे.आपण योजना मंजूर करताना सगळे सोबत असतो. अर्थसंकल्प मंजूर करताना देखील सगळे सोबत असतो. विधिमंडळात देखील अर्थसंकल्प मंजूर होताना सगळे असतो, अशा शब्दांत मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्र्यांचे कान टोचले.गमतीच्या गोष्टी सीरियसली का घेता?उद्धव ठाकरेंना तुम्ही तुमच्यासोबत येण्याची ऑफर दिली आहे, त्याबाबत विचारले असता, अहो...उद्धवजी देखील याबाबत बोलले आहेत की अशा गोष्टी गांभीर्याने घ्यायच्या नसतात.आम्ही खेळीमेळीच्या वातावरणात बोललो तरी हेडलाईन होते. मी बोललो तर ती ऑफर झाली का? अलीकडच्या काळात संवाद होत असेल किंवा गंमत - जंमत होते ती का सिरियसली घेता, असा उलट सवाल फडणवीस यांनी केला.

विरोधी पक्षात एकी दिसलीच नाहीउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अधिवेशनात विरोधी पक्षांची एकी दिसलीच नाही, असे सांगितले. अंतिम आठवडा प्रस्तावात खोटे प्रश्न होते. चुकीच्या माहितीच्या आधारावर कामकाज करण्याचा प्रयत्न केला, असा आरोपही त्यांनी केला. विरोधकांनी पायऱ्यांवर आंदोलन केले. मात्र, त्यांच्याकडे ठोस मुद्देच नव्हते. विधिमंडळात मारामारीचा झालेला प्रकार अक्षम्य होता, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसFarmerशेतकरी