शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
3
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
4
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
5
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
6
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
7
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
8
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
9
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
10
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
11
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
12
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
13
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
14
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
15
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
16
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
17
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
18
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
19
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
20
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही भिकारी नाही असे ठणकावत स्वाभिमानी, रासप महायुतीतून बाहेर

By admin | Updated: September 24, 2014 13:16 IST

जागावाटपावरुन महायुतीमध्ये अखेर फुट पडली असून राष्ट्रीय समाज पक्ष, स्वाभिमानी संघटना व शिवसंग्राम संघटना या लहान घटक पक्षांनी महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. २४ - शेवटच्या क्षणापर्यंत गोड बोलून झुलवत ठेवलं आणि आमच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप करत राष्ट्रीय समाज पक्ष, स्वाभिमानी संघटना व शिवसंग्राम संघटना या लहान घटक पक्षांनी महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अखेर शिवसेना व भाजपा या दोन महायुतीतील मोठ्या पक्षांच्या जागावाटपाच्या लठ्ठालठ्ठीत लहान घटकपक्षांचा बळी गेल्याचे व त्याविरोधात बंड करत या पक्षांनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतल्याचे महादेव जानकर व सदाभाऊ खोत यांनी सांगितले.

आम्ही शिवसेनेसोबत होतो परंतु त्यांनी आम्हाला भिका-यासारखं वागवल्याची बोचरी टीका जानकर यांनी केली असून आम्ही भिकारी नसल्याचे सांगताना स्वतंत्र लढू आणि महाराष्ट्राच्या जनतेसमोर या दोन्ही पक्षांचा दांभिकपणा उघड करू असे म्हटले आहे. शिवसेना - भाजप नेत्यांनी अखेरपर्यंत झुलवत ठेवले व अवघ्या सात जागा देऊन अपमान केला अशी घणाघाती टीका करत महायुतीतून बाहेर पडणार असल्याची घोषणा रासपचे महादेव जानकर यांनी केली आहे. 

जागावाटपावरुन शिवसेना - भाजप यांच्यात तणाव निर्माण झाला होता व युती तुटेल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. अखेरीस मंगळवारी शिवसेना - भाजप नेत्यांमध्ये बैठक झाली होती. या बैठकीत युती टिकवण्यासाठी शिवसेना - भाजपने महायुतीतील लहान पक्षांना सात जागा देण्याची दर्शवली होती. या प्रस्तावावर राष्ट्रीय समाज पक्ष, स्वाभिमानी संघटना आणि शिवसंग्राम संघटना या घटक पक्षांनी नाराजी दर्शवली. बुधवारी रासपचे अध्यक्ष महादेव जानकर व स्वाभिमानी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी महायुतीतून बाहेर पडणार असल्याची घोषणा केली. बुधवारी संध्याकाळी सहा वाजता आम्ही आमच्या उमेदवारांची यादी जाहीर करणार असून त्यावेळीच हा निर्णय का घेतला याविषयी आमची परखड भूमिका मांडू असे दोघांनीही स्पष्ट केले.