शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पाणलोट समितीला आता ग्रामविकास समितीचा दर्जा

By admin | Updated: August 20, 2014 22:17 IST

पाणलोट समितीला ग्रामविकास समितीचा दर्जा देण्याचा निर्णय राज्याच्या ग्रामविकास आणि जलसंधारण विभागाने १९ ऑगस्ट रोजी घेतला.

अकोला- एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत गठीत करण्यात आलेल्या पाणलोट समितीला ग्रामविकास समितीचा दर्जा देण्याचा निर्णय राज्याच्या ग्रामविकास आणि जलसंधारण विभागाने १९ ऑगस्ट रोजी घेतला. त्यानुसार यापुढे गठीत होणार्‍या पाणलोट समित्यांची संस्था नोंदणी अधिनियमाअंतर्गत नोंदणी करण्याची आवश्यकता राहणार नाही. राज्यात २00८ पासून एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत पाणलोट क्षेत्र विकासाच्या प्रकल्पांची अंमलबजावणी करण्याकरिता ग्रामसभेद्वारे पाणलोट समिती गठीत करण्यात येते. १0 सदस्यांच्या या समितीची ग्रामसभेने निवड केल्यानंतर संस्था नोंदणी अभियनियानुसार नोंदणी करून घेणे बंधनकारक आहे. नोंदणी झाल्याशिवाय ही समिती अधिकृत मानली जात नव्हती. वास्तविक, समितीची निवड झाल्यानंतर नोंदणी करण्यासाठी ४ ते ५ महिने उलटून जात होते; मात्र संस्थेची नोंदणी झाली नसल्याने प्रकल्पांची कामे सुरू करण्यात अडचणी येत होत्या. ही बाब लक्षात घेऊन शासनाने पाणलोट समितींचे स्वरुप बदलण्याचा निर्णय घेतला. त्याअनुषंगाने १९ ऑगस्ट रोजी ग्रामविकास आणि जलसंधारण विभागाने दिलेल्या आदेशानुसार, यापुढे पाणलोट समित्यांची निवड ग्रामसभेमार्फतच ग्रामविकास समिती म्हणून केली जाईल. या समितीची नोंदणी करण्याची आवश्यकता राहणार नाही. त्यामुळे समिती नोदणी करण्यास होणारा विलंब टाळता येईल.

** नोंदणी न झालेल्या समित्यांना दिलासा

पाणलोट समिती म्हणून ग्रामसभेने निवड केल्यानंतरही अद्याप नोंदणी न झालेल्या समित्यांना शासनाच्या नव्या निर्णयाने दिलासा मिळाला आहे. नव्या आदेशानुसार निवड झालेल्या समितीला ग्राम विकास समिती म्हणून मान्यता दिली जाणार असून, या समित्यांना संस्था नोंदणी अधिनियमानुसार नोंदणी करण्याची आवश्यकता राहणार नाही.

** १0६४ प्रकल्पांना मंजुरी

केंद्र शासनाने एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमाअंतर्गत २0१३-१४ पर्यंंत १0६४ प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्या भूसंसाधन विभागाने मंजुरी दिलेल्या या प्रकल्पांच्या अंमलबजावणीत ग्रामपंचायतींचा सहभाग वाढविण्यात येईल. त्यासाठी ५ वर्षांंंचा कालावधी निश्‍चित करण्यात आला आहे. यापूर्वी हा कालावधी ४ ते ७ वर्षांंपर्यंंंत होता. त्यातच पाणलोट समितीचे गठण आणि समितीची नोंदणी करण्यात बराच कालावधी जात होता. ते टाळून प्रकल्पांची कामे तात्काळ मार्गी लावण्याच्या दृष्टीने ग्राम विकास समिती गठीत करण्यास शासनाने मंजुरी दिली असल्याचे जलसंधारण विभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितले.