शहरं
Join us  
Trending Stories
1
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
2
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
3
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
4
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
5
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
6
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
7
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
8
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
9
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
10
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
11
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
12
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
13
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
14
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
15
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
16
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
17
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
18
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
19
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

अखेर कुकसा प्रकल्पातून सिंचनासाठी सोडले पाणी !

By admin | Updated: January 1, 2017 18:35 IST

कुकसा प्रकल्पातून शेती सिंचनासाठी कालव्याद्वारे सोडण्यात येणारे पाणी मागील काही दिवसांपासून मध्येच अडविण्यात येत होते.

ऑनलाइन लोकमतवाशिम, दि. 1 - शिरपूर जैन इथल्या कुकसा प्रकल्पातून शेती सिंचनासाठी कालव्याद्वारे सोडण्यात येणारे पाणी मागील काही दिवसांपासून मध्येच अडविण्यात येत होते. या संदर्भात लोकमतने २६ डिसेंबरच्या अंकात पाणी रोखल्याने रब्बी पिके संकटात या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत लघू पाटबंधारे विभागाने रविवार प्रकल्पातून पाणी सोडले.मालेगाव तालुक्यातील शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या; परंतु रिसोड तालुक्यात असलेल्या कुकसा येथे काच नदीवर काही महिन्यांपूर्वीच जलप्रकल्पाची उभारणी करण्यात आली. त्यामुळे या परिसरातील केनवड, जोगेश्वर, कुकसा, गणेशपूर, अंचल अशा काही गावांतील साडेसहाशे हेक्टर शेतीला त्याचा फायदा होऊ लागला आणि शेतकरी या प्रकल्पाच्या पाण्यावर सिंचन करू लागले. यामध्ये पेनबोरी येथील शेकडो शेतकऱ्यांचा समावेश आहे. यंदा पाऊस चांगला झाल्याने कुकसा प्रकल्पात मुबलक पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे सिंचन क्षेत्रात किंवा रब्बीच्या क्षेत्रात वाढ झाली असून, पेनबोरी येथील शेतकऱ्यांनाही या प्रकपातून पाणी देण्याचा ठराव झाला आणि यावेळी मोठ्या प्रमाणात हळद, गहू, हरभरा या पिकांची पेरणी केली. कुकसा प्रकल्पातून वेळेवर पाणी सोडण्यास सुरुवात झाल्याने ही पिके चांगली बहरू लागली. मात्र, काही दिवसांपूर्वी जोगेश्वरी येथील काही कुप्रवृत्तीच्या लोकांनी पेनबोरीकडे जाणारे प्रकल्पाचे पाणी अडविले. या संदर्भात येथील शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाकडे तक्रार करून पाणी नियमित सोडण्याची मागणी केली. त्यानुसार सबंधित अधिकाऱ्यांनी बंद केलेले पाणी एक दोन वेळा पुन्हा सोडले; परंतु हे पाणी जोगेश्वरी येथील काही लोकांकडून पुन्हा पुन्हा अडविल्या जात होते. त्यामुळे पेनबोरी परिसरातील विविध प्रकारची आठशे एकरामधील पिके संकटात सापडली. या संदर्भात लोकमतने वृत्त प्रकाशित करताच पाटबंधारे विभागाने कुकसा प्रकल्पातून रविवारपासून पेनबोरीसाठी पाणी सोडण्यास सुरुवात केली.