प्रस्तावित १९ पूल मार्गी लागण्याची प्रतीक्षा

By Admin | Updated: May 24, 2014 01:08 IST2014-05-23T20:40:04+5:302014-05-24T01:08:29+5:30

अकोला जिल्ह्यातील वाढती लोकसंख्या आणि वाहतुकीच्या तुलनेत पुलांची वानवा जाणवत आहे.

Waiting for the proposed 19 bridge to arrive | प्रस्तावित १९ पूल मार्गी लागण्याची प्रतीक्षा

प्रस्तावित १९ पूल मार्गी लागण्याची प्रतीक्षा

अकोला : जिल्ह्यातील वाढती लोकसंख्या आणि वाहतुकीच्या तुलनेत पुलांची वानवा जाणवत आहे. या पृष्ठभूमीवर प्रस्तावित १९ पुलांची कामे केव्हा मार्गी लागणार, याबाबतची प्रतीक्षा केली जात आहे.
गेल्या पावसाळ्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यातील रस्त्यांची पार वाट लागली. खड्डेमय झालेल्या रस्त्यांवरून चालताना वाहनधारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत असून, वाहतुकीलाही कमालीचा अडथळा निर्माण होत आहे. रस्ते समस्यांसोबतच जिल्ह्यात सध्या अस्तित्वात असलेल्या पुलांची संख्या तोकडी आहे. तसेच काही पुलांची दुरवस्था झाली आहे. पूल नसल्याने पावसाळ्यात पूरपरिस्थितीच्या काळात जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तुटल्याचे प्रसंग घडत असतात. तसेच या समस्येचा फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे. शहरी आणि ग्रामीण भागात पुलांची वानवा जाणवत असल्याने वाहतुकीची कोंडी होत असून, त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यात प्रस्तावित करण्यात आलेल्या नवीन पुलांची कामे मार्गी लागण्याची प्रतीक्षा केली जात आहे.

** ३२ मोठे; २४२ लहान पूल!
सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत जिल्ह्यात सध्या ३२ मोठे आणि २४२ लहान पूल आहेत. त्यामध्ये राज्य मार्गावर २८ मोठे आणि १४६ लहान पूल आहेत. तसेच जिल्ह्यातील प्रमुख मार्गांवर ४ आणि लहान ९५ पूल आहेत. याशिवाय राज्य मार्गावर ८५९ रपटे असून, जिल्हा मार्गांवर ८४२ रपटे आहेत.

** गांधीग्राम व डाबकी  पुलाचा प्रश्न मार्गी !
अकोला-आकोट मार्गावरील गांधीग्राम पुलाची दुरवस्था झाली आहे. पावसाळ्यात पूर्णेला पूर आल्यास या पुलावरून पाणी वाहत असते. त्यामुळे वाहतूक ठप्प झाल्याने नागरिकांना हेलपाटे सहन करावे लागतात. त्यामुळे येथे नवीन पूल बांधण्याची गेल्या अनेक वर्षांची या भागातील नागरिकांची मागणी होती. अखेर गांधीग्रामच्या पुलासह पोचमार्गाच्या कामाला शासनामार्फत गेल्या ऑगस्टमध्ये मंजुरी प्राप्त झाली. पूल आणि रस्त्याच्या कामांसाठी २५ कोटी ६३ लाखांचा निधीदेखील मंजूर झाला. निविदा प्रक्रियेनंतर लवकरच या पुलाच्या कामाला सुरुवात होणार आहे. तसेच केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत अकोला शहरानजीकच्या डाबकी रेल्वे उड्डाण पुलाच्या कामासाठी २५ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. लवकरच या उड्डाण पुलाचे कामदेखील सुरू होणार आहे. त्यामुळे या दोन्ही पुलांचा प्रश्न आता मार्गी लागला आहे.

Web Title: Waiting for the proposed 19 bridge to arrive