शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

‘मतांची खरेदी हा लोकशाहीचे धिंडवडे काढणारा प्रकार; मंत्र्यांच्या कबुलीने मतचोरीवर शिक्कामोर्तब’, काँग्रेसची टीका   

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2025 16:15 IST

Harshwardhan Sapkal Criticize Mahayuti:  नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात सत्ताधारी पक्षाचे मंत्रीच ‘कोणाचेही पैसे घ्या, पण मतं मात्र आम्हालाच द्या’, असे जाहीरपणे सांगतात हा लोकशाहीचे धिंडवडे काढण्याचा प्रकार आहे, अशी टीका  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. 

मुंबई/बुलढाणा -  नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात सत्ताधारी पक्षाचे मंत्रीच ‘कोणाचेही पैसे घ्या, पण मतं मात्र आम्हालाच द्या’, असे जाहीरपणे सांगतात हा लोकशाहीचे धिंडवडे काढण्याचा प्रकार आहे. भाजपा महायुतीचे काम ‘पैसा फेक तमाशा देख’ असा असून, मंत्रीच जाहीरपणे कबुली देतात याचा अर्थ काँग्रेस व राहुल गांधी यांनी उघड केलेल्या मतचोरीवर शिक्कामोर्तबच आहे, अशी टीका  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.   बुलढाणा येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात, कार्यकर्त्यांनी या निवडणुका स्वबळावर लढवाव्यात अशी मागणी केलेली आहे त्याचा आदर ठेवून काँग्रेस व महाविकास आघाडीतील पक्ष निवडणुका लढवत आहेत. काही ठिकाणी आघाडी झालेली आहे, तर काही ठिकाणी स्वबळावर लढाई होत आहे. शरद पवार व उद्धव ठाकरे यांना याची कल्पना दिलेली होती, यामुळे आघाडीत कोणी नाराज असण्याचा प्रश्नच नाही. जिल्हा परिषद व महानगरपालिका निवडणुकांचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही, त्यावर नंतर निर्णय घेतला जाईल.महायुतीतील अंतर्गत वादावर बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, महायुतीतील ट्रिपल इंजिन सरकार हे सत्तेशिवाय राहू शकत नाही, भाजपा, शिंदेसेना व अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस हे सत्तेसाठी लाचार आहेत, त्यामुळे महायुतीत कितीही धुसफूस असली तरी सत्तेसाठी ते जुळवून घेतील, असे सपकाळ म्हणाले.कुंभमेळ्यासाठी नाशिकच्या तपोवनमधील १८०० झाडं तोडण्याच्या मुद्द्यावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, साधू हे दऱ्या खोऱ्या, डोंगर, हिमालय तसेच निसर्गाच्या सानिध्यात राहतात, ही अध्यात्माची परंपरा आहे. नाशिकमध्ये कुंभमेळा होत आहे. पण पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन होत नसेल तर ते कोणालाही परवडणारे नाही. झाडांची कत्तल केली नाही तर पैसे कसे लाटता येतील. मोठ्या प्रमाणावर झाडं तोडणे हे एक निमित्त आहे, खरे कारण झाडं तोडून मैदान माकळं करायचे व त्यातून खिसे भरायचे असा प्रकार आहे असे सपकाळ म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल विचारलेल्या प्रश्नावर बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, ते मला ओळखत नाहीत असे म्हणत असतील तर काही हरकत नाही, आम्ही दोघे विदर्भातील आहोत ते मुख्यमंत्री असताना मी ५ वर्षे विधानसभेत विविध प्रश्न मांडले त्याची उत्तरे त्यांनी दिलेली आहेत. मला ओळखावे हा माझा अट्टाहास नाही व ओळखावे यासाठी जे प्रोफाईल हवे तसा मी भ्रष्टाचार केलेला नाही, पक्ष बदललेले नाहीत, ईडीची प्रकरणे नाहीत, संस्था माझ्याकडे नाहीत. मी एका सर्व साधारण कुटंबातील आहे. फडणवीस यांची बुद्धी तल्लख आहे असे वाटत होते. ओळखीचे त्यांचे निकष काय आहेत ते माहीत नाही परंतु त्यांनी जनतेला दिलेली आश्वासने मात्र विसरू नयेत. महाराष्ट्राचे वाट्टोळे करणारे गुंड कोण आहेत, त्यांना तरी ओळखा व धडा शिकवा असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.मुख्यमंत्र्यांना गजनी म्हटले त्यामागे त्यांना त्यांच्या विधानांचा विसर पडला आहे म्हणून बोललो. विदर्भ वेगळा झाल्याशिवाय लग्न करणार नाही असे ते म्हणाले होते पण त्यांनी लग्न केले. अजित पवारांना चक्की पिसिंग करायला लावू, राष्ट्रवादी काँग्रेसशी कधीच युती करणार नाही असे म्हणाले पण युती केली व अजित पवारांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. सरकार येताच पहिली सही धनगर आरक्षणाच्या फाईलवर करू म्हटले होते. नांदेडमध्ये २०१४ पर्यंत विकासच झाला नाही असेही ते  म्हणाले, त्यांच्या लक्षात काहीच रहात नाही म्हणून गजनी म्हणालो असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Vote buying undermines democracy; minister's admission confirms vote theft: Congress criticism.

Web Summary : Congress slams ruling party ministers for openly encouraging vote-buying. Sapkal accuses BJP of prioritizing money over values, stating ministers' admission confirms Congress's earlier claims of electoral malpractices. He criticizes the ruling coalition's infighting and addresses environmental concerns related to Nashik's Kumbh Mela.
टॅग्स :Local Body Electionस्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकHarshavardhana Sapkalहर्षवर्धन सपकाळcongressकाँग्रेसMahayutiमहायुती