शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

वेळुकच्या तरुणांचा गणेशोत्सवातील 'गावची शाळा-गावाचा विकास' उपक्रम

By admin | Updated: September 13, 2016 19:53 IST

ठाणे जिल्ह्यातील वेळुक या अतिदुर्गम खेड्यातील तरुणांनी यावर्षी अभिनव गणेशोत्सव साजरा केला.

ऑनलाइन लोकमत 
मुरबाड, दि. १३ - ठाणे जिल्ह्यातील वेळुक या अतिदुर्गम खेड्यातील तरुणांनी यावर्षी अभिनव गणेशोत्सव साजरा केला. गणेशोत्सवात रात्रीच्यावेळी जुगाराचे फड रंगतात. या असंस्कृतपणाला वेळुकच्या तरुणांनी मोडीत काढत या तरुणांनी एकत्र येऊन 'गावची शाळा आणि गावाचा विकास' हा कार्यक्रम हाती घेतला.
 
लोकमान्य टिळकांनी सुरु केलेल्या गणेशोत्सवाच्या मूळ हेतूचा आज सर्वांना विसर पडला आहे. मात्र वेळूक गावतील तरुणांच्या या कृतीतून टिळकांचा शुद्ध हेतू पुन्हा सफल करण्याचा प्रयत्न दिसून येतो.  
 
या तरुणांनी रात्रभर जागून गावच्या शाळेची सुधारणा, शाळा डिजिटल करणे,गावाचा विकास, गावातील आरोग्य उपकेंद्रात २४ तास कर्मचारी उपलब्ध करणे. जलयुक्त शिवार योजना राबवणे. अनियमित वीजपुरवठा, सांडपाणी,गटारे,रस्ते,पिण्याच्या पाण्याच्या समस्या या विषयांवर सविस्तर चर्चा केली, तर दुसऱ्या दिवशी थेट तालुक्याचे ठिकाण मुरबाड येथे संबंधीत अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांना लेखी निवेदने दिली.
 
केवळ चर्चा आणि लेखी निवेदने यांवर न थांबता या  तरुणांनी  शाळा सुधार समिती स्थापन केली. बँक ऑफ महाराष्ट्र, शिरोशी शाखा येथे रीतसर खाते उघडून त्यांनी शाळा डिजिटल करण्यासाठी ५० हजाराचा निधी जमा केला.अनंत चतुर्दशीपासून गावातील इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी जादा क्लासेस सुरु करण्यात येत आहेत कारण १० कि,मी. च्या परिसरात क्लासेस उपलब्ध नाहीत.तर पुढच्या १५ दिवसांत गावात वाचनालय सुरु करण्यात येत आहे, त्यासाठी पुस्तकांची खरेदी सुरु करण्यात आली आहे.
   
येत्या २६ जानेवारीपर्यंत शाळेच्या सर्व इमारतींची दुरुस्ती करून, कंपाउंड वॉल बांधणे. शाळेसाठी खेळाचे साहित्य ,इ-लर्निंग साहित्य खरेदी करून पुरवणे आणि शाळा हायटेक डिजिटल करणे हा निश्चय या तरुणांनी केला आहे.या तरुणांनी समाजातील दानशूर व्यक्ती,संस्था आणि लोकप्रतिनिधींना मदतीचे आवाहन केले आहे.