शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

विक्रोळीकरांचा माझ्यावर विश्वास

By admin | Updated: October 11, 2014 06:11 IST

नगरसेवक म्हणून निवडून आलो. महापालिकेत मनसेचा गटनेता म्हणून जबाबदारी सांभाळली. नगरसेवक म्हणून जी कामे केली त्यावर विश्वास ठेवून विक्रोळीकरांनी मला आमदार म्हणून निवडून दिले

तुम्ही राजकारणात कसे आलात?- राजकारणात आल्याशिवाय समाजसेवा करणे, जनतेच्या अडीअडचणी सोडविणे किंवा आवश्यक असलेली विकासकामे, मोठे प्रकल्प आणून परिसराचा विकास करणे शक्य नाही या जाणिवेतून राजकारणात उडी घेतली. राज ठाकरे यांनी संधी दिली. त्याचे सोने केले. नगरसेवक म्हणून निवडून आलो. महापालिकेत मनसेचा गटनेता म्हणून जबाबदारी सांभाळली. नगरसेवक म्हणून जी कामे केली त्यावर विश्वास ठेवून विक्रोळीकरांनी मला आमदार म्हणून निवडून दिले. त्यामुळे आत्मविश्वास वाढला आणि पुढेही अशीच समाजसेवा कायम ठेवण्याचा दृढनिश्चय करून रिंगणात उतरलो.कोणते मुद्दे घेऊन तुम्ही प्रचार करता आहात?- नगरसेवक, आमदार म्हणून लादीकरणापासून उड्डाणपूल, थीमपार्क, आंतरराष्ट्रीय जलतरण तलाव यासारख्या मोठ्या प्रकल्पांपर्यंत जी कामे मी केली तीच जनतेसमोर मांडतो आहे. जनतेने पुन्हा संधी दिली तर मी माझे व्हिजन निश्चित केले आहे आणि मी जी वचने, आश्वासने देतो ती पूर्ण करतो, हे विक्रोळीकरांना माहीत आहे.पाच वर्षांतले तुमचे रिपोर्ट कार्ड काय सांगते?- प्रजा फाउंडेशनने शहरातील ३६ आमदारांच्या कामावरून एक रिपोर्ट कार्ड तयार केले होते. त्यात सर्वात कमिटेड आणि पॉप्युलर आमदार म्हणून माझी निवड झाली होती. केलेल्या कामांची जंत्री मोठी आहे. कांजूर डम्पिंग ग्राउंड बंद करण्यासाठी आंदोलन केले. सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. सतत पाठपुरावा करून विक्रोळीचे फाटक बंद करून घेतले आणि दरवर्षी सुमारे तीनशे जणांचे प्राण वाचविले. पर्यायी मार्ग म्हणून उड्डाणपूल मंजूर करून घेतला. या कामासाठी ठेकेदाराची नेमणूकही झाली आहे. पादचारी पूल, त्यावर सरकता जिना बसवून घेतला. माझे जग हे थीम पार्क, महात्मा फुले रुग्णालयात अद्ययावत डायलिसीस सेंटर, सुपरस्पेशालिटी रुग्णालय, अनेक वर्षे रखडलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्वीमिंगपूलचे काम सुरू केले. ३६ कोटी खर्चून कन्नमवार नगर, टागोर नगरात मलनिस्सारण वाहिन्या बदलल्या. पालिकेत गटनेता असताना बिल्डरांच्या घशात चाललेले अनेक भूखंड वाचविले.