शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO - दर्ग्यावरची चादर फडफडली, श्वासोच्छवास घेतल्याचा दावा

By admin | Updated: October 12, 2016 19:29 IST

सिसा-बोंदरखेड येथील हजरत शामनशाहवली बाबांच्या दर्ग्या वरील चादर फडफडत होती त्यामुळे दर्ग्यान ने श्वाच्छोश्वास घेतल्याचा दावा १० आॅक्टोबरला भाविकांनी केला.

- आगाखान पठाण/ बाभुळगाव जहॉगीर/ऑनलाइन लोकमत

 अकोला, दि.12 - सिसा-बोंदरखेड येथील हजरत शामनशाहवली बाबांच्या दर्ग्या वरील चादर फडफडत होती त्यामुळे दर्ग्यान ने श्वाच्छोश्वास घेतल्याचा दावा १० आॅक्टोबरला भाविकांनी केला. असून याबाबत एक व्हिडीओ क्लीपही सादर सध्या व्हायरल झाली आहे.या क्लीपमध्ये दर्गाहवरील चादरीमधून स्पंदने होत असल्याचे दिसत आहे.या घटनेची माहिती मिळताच समाधी स्थळाचे दर्शन घेण्यासाठी परिसरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. दर्ग्याची स्पंदने का, झाली याचे कारण मात्र, समजु शकले नाही. अंनिसे भाविकांचा हा दावा फेटाळला असून कुठल्याही कारणाशिवाय घटना घडत नसल्याचे म्हटले आहे. सिसा-बोंदरखेड येथील हजरत शामनशाहवली बाबांच्या दर्ग्याचे एक भाविक १० आॅक्टोबरला दर्शन घेत होता. त्यावेळी त्याला दर्ग्यामधून स्पंदने होत असल्याचे आढळले. त्याने ही बाब तेथे उपस्थित मौलवींना सांगितली. त्यानंतर ही गोष्ट परिसरात परसरल्याने भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. खात्री करण्यासाठी दर्ग्यामध्ये फक्त पाच-सहा जणांना प्रवेश देण्यात आले. हजरत शामनशाहवली बाबांच्या समाधीवर असलेल्या फुलांची चादर व गलेबच्या खाली काहीतरी असेल, अशी शंका उपस्थितांना आल्याने त्यांनी एक एक करून फुलांची चादर व गलेब काढले. परंतु त्यात काही निघाले नाही,असा दावा प्रत्यक्षदर्शी भाविकाने केला. यानंतर उपस्थितांनी या दर्गाहमध्ये धार्मिक विधीचे पठण केले. हफीज अफसर साहब यांनी समाधीस्थळी अपवित्र मनाने कोणत्या तरी भाविकाने प्रवेश केला असल्यानेच असा प्रकार घडल्याचा दावा केला आहे. अनिसंने मात्र,हा दावा फेटाळला असून कुठलीही घटना ही कारणांशिवाय घडत नसल्याचे सांगितले.

बाबांची समाधी धडकत असल्याचे मी प्रत्यक्ष पाहीले. माझ्या समक्ष समाधीवरील फुलांची चादर व गलेब काढण्यात आले होते. परंतु यात काहीही निघाले नाही.- अफरोज खान पठाणप्रत्यक्षदर्शी भाविककारणाशिवाय कुठलीही घटना घडत नाही. चमत्कार हा प्रकारच अस्तित्वात नाही. प्रत्येक घटनेमागे काहीतरी कारण असते ते कारण शोधण्याची गरज आहे.- अशोक घाटेराज्य सहसंघटक, अंनिस