"रायगडचं चॅलेंज छ.संभाजीनगरवाल्यांनी स्वीकारावं" दानवेंच्या 'कॅश बॉम्ब'वर गोगावलेंची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 11:00 IST2025-12-09T10:58:39+5:302025-12-09T11:00:48+5:30

महाराष्ट्राच्या हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी एक 'व्हिडीओ बॉम्ब' टाकून राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली.

'Video Bomb' Rocks Maharashtra Politics Ahead of Winter Session: Thackeray Faction Leader ambadas danve Accuses Shinde MLA Mahendra Dalvi of Cash Misconduct | "रायगडचं चॅलेंज छ.संभाजीनगरवाल्यांनी स्वीकारावं" दानवेंच्या 'कॅश बॉम्ब'वर गोगावलेंची प्रतिक्रिया

"रायगडचं चॅलेंज छ.संभाजीनगरवाल्यांनी स्वीकारावं" दानवेंच्या 'कॅश बॉम्ब'वर गोगावलेंची प्रतिक्रिया

महाराष्ट्राच्या हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी एक 'व्हिडीओ बॉम्ब' टाकून राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली. दानवे यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये एक व्यक्ती पैशांच्या गड्ड्यांसोबत दिसत असून, ही व्यक्ती शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी असल्याचा दावा त्यांनी केला आहे. मात्र, दळवी यांनी अंबादास दानवेंनी केलेले आरोप फेटाळून लावले आणि पुरावा दाखवल्यास राजीनामा देईल, असे थेट आव्हान केले. यावर शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांनी आपली प्रतिक्रिया दिली. "दानवेंनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्थ नाही. या रायगडचं चॅलेंज छत्रपती संभाजीनगरवाल्यांनी स्वीकारावे", असे ते म्हणाले. 

अंबादास दानवे यांनी 'एक्स'वर हा व्हिडीओ पोस्ट करत सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. त्यांनी लिहिले की, "या सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीला पैसा नाही...बाकी सगळं ओक्के आहे! जनतेला जरा सांगा मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदे जी, हे आमदार कोण आहेत आणि पैशांच्या गड्ड्यांसह काय करत आहेत?"

व्हिडीओ माझा नाही, पुरावा दाखवा, राजीनामा देतो- दळवी

आमदार महेंद्र दळवी यांनी दानवे यांचे सर्व आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. त्यांनी हा व्हिडीओ आपला नसल्याचे स्पष्ट करत अंबादास दानवेंना थेट आव्हान दिले. दळवी म्हणाले की, "अंबादास दानवेंनी तो व्हिडीओ नीट दाखवावा. लाल टी-शर्टमधील व्यक्ती कोण, हे त्यांनी सांगावे. मी व्हिडीओत असेल तर मी आमदारकीचा राजीनामा देईन." दळवी यांनी दानवेंवर 'ब्लॅकमेल' करण्याचा आणि 'सुपारीबाज नेता' असल्याचा गंभीर आरोप केला. ते म्हणाले की, "दानवेंनी हा व्हिडीओ माझा आहे, हे सिद्ध करून दाखवावे आणि व्हिडीओ 'मॉर्फ' करून दाखवू नये."

'रायगडचे चॅलेंज संभाजीनगरवाल्यांनी स्वीकारावे- गोगावले

शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांनी दळवींची बाजू घेत अंबादास दानवेंच्या आरोपांमध्ये तथ्य नाही असे म्हटले आहे. गोगावले म्हणाले की, "दानवेंनी दळवींचा चेहरा दाखवावा आणि दूध का दूध आणि पाणी का पाणी करावे. विरोधी पक्षनेते पद गेले आणि आमदारकीही गेली. त्यामुळे चर्चेत राहण्यासाठी हे केले जात आहे." गोगावलेंनी दळवींना पाठिंबा दर्शवत दानवेंना टोला लगावला, "या रायगडचं चॅलेंज छत्रपती संभाजीनगरवाल्यांनी स्वीकारावे." त्यांनी स्पष्ट केले की, त्यांचा पक्ष चुकीला पाठिंबा देत नाही आणि ते दळवींसोबत आहेत. या आरोप-प्रत्यारोपांमुळे अधिवेशनापूर्वीच महाराष्ट्राचेराजकारण तापले असून, आता दानवे पुढील पुरावे सादर करतात की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title : रायगढ़ चुनौती: दानवे के आरोपों पर गोगावले की प्रतिक्रिया।

Web Summary : दानवे के वीडियो में विधायक दलवी पर नकदी के साथ शामिल होने का आरोप लगने से राजनीतिक उथल-पुथल मच गई। दलवी ने दावों का खंडन किया, और दानवे को साबित करने की चुनौती दी। गोगावले ने दलवी का समर्थन किया और दानवे के इरादों पर सवाल उठाया।

Web Title : Raigad challenge: Gogawale responds to Danve's cash bomb allegations.

Web Summary : Danve's video alleging MLA Dalvi's involvement with cash sparks political turmoil. Dalvi denies claims, challenging Danve to prove it. Gogawale supports Dalvi, questioning Danve's motives.