शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO- सकल मराठा समाजाने दाखविली एकजूट!

By admin | Updated: September 25, 2016 18:38 IST

जिल्ह्यातील तमाम सकल मराठा समाजाने आज आयोजित अभूतपूर्व मूकमोर्चात लाखोच्या संख्येने एकजूट दाखविली.

ऑनलाइन लोकमतवाशिम, दि. 25 - कोपर्डी येथील युवतीवर अमानूषपणे अत्याचार करणाऱ्या आरोपींना तत्काळ फासावर लटकवा, अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात सुधारणा करा या व अन्य महत्वाच्या मागण्यांसाठी जिल्ह्यातील तमाम सकल मराठा समाजाने आज आयोजित अभूतपूर्व मूकमोर्चात लाखोच्या संख्येने एकजूट दाखविली. ऐतिहासिक पद्धतीने झालेल्या या मोर्चामध्ये विशेषत: महिलांची लक्षणिय उपस्थिती दिसून आली.कोपर्डी (जि.अहमदनगर) येथील मुलीवर झालेल्या अत्याचाराचा निषेध नोंदविण्यासोबतच सकल मराठा समाज बांधवांनी अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात सुधारणा, स्वामिनाथन आयोग लागू करणे, वाढत्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना आळा घालणे, यासह इतरही शासनस्तरावरून दुर्लक्षित मागण्यांचे निवेदन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे पाठविले. अत्यंत शांत व संयमाची परिचिती देणाऱ्या या मोर्चास स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीपासून नियोजित वेळेनुसार दुपारी १२ वाजता प्रारंभ झाला. स्थानिक शिवाजी चौकात मोर्चा आल्यानंतर मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या १२ युवतींनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास हारार्पण केला. तेथून थेट हा मोर्चा जिल्हा क्रीडांगणावर पोहचला. लाखोच्या संख्येत आलेल्या मोर्चेकऱ्यांनी यावेळी पावसाची देखील कुठलीच तमा न बाळगता आपला नि:शब्द हुंकार व्यक्त केला. ६ युवतींनी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केले. तसेच प्रचंड जनसमुदायासमोर १२ पानी निवेदनाचे वाचन करण्यात आले. ...................................महिला शक्तीचे घडले दर्शनसकल मराठा समाजाने वाशिममध्ये काढलेल्या मूकमोर्चात समाजातील महिलांनी उत्स्फूर्तपणे हजेरी लावली. विशेष बाब म्हणजे धो-धो पाऊस सुरू असताना आणि जिल्हा क्रीडांगणावर सर्वत्र चिखल साचलेला असतानाही महिलांनी त्याठिकाणी तब्बल एक ते दीड तास शांततेत उपस्थिती दर्शविली. आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलांच्या संख्येचा हा आकडा २ लाखापेक्षा अधिक होता. ...................पीडित युवतीसोबतच शहीद जवानांना वाहिली श्रद्धांजलीजिल्हा क्रीडांगणावर मोर्चा पोहचल्यानंतर प्रारंभी कोपर्डी येथील त्या पिडित युवतीसोबतच समाजबांधवांनी उरी येथील आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी लाखोचा जनसमुदाय दोन मिनीटासाठी स्तब्ध झाला होता.