शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भ विकासाच्या आड येणाऱ्यास आडवं करू

By admin | Updated: June 29, 2014 00:37 IST

विदर्भातील शेतकरी अतिवृष्टी व गारपिटीने पार खचून गेला आहे. मात्र त्यांना अद्याप मदत मिळालेली नाही. परिणामी वैदर्भीय जनतेने लोकसभेच्या निवडणुकीत कॉंग्रेस व राष्ट्रवादीचा सफाया केला.

उद्धव ठाकरेंचा इशारा : ‘माझा महाराष्ट्र, भगवा महाराष्ट्र’ अभियान प्रारंभगोंदिया : विदर्भातील शेतकरी अतिवृष्टी व गारपिटीने पार खचून गेला आहे. मात्र त्यांना अद्याप मदत मिळालेली नाही. परिणामी वैदर्भीय जनतेने लोकसभेच्या निवडणुकीत कॉंग्रेस व राष्ट्रवादीचा सफाया केला. आता येत्या विधानसभेतही भगवा फडकू द्या. वचन देतो विदर्भ विकासाच्या आड येणाऱ्यास आडवं करू असा इशारा शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. ‘माझा महाराष्ट्र, भगवा महाराष्ट्र्र अभियानाचा शुभारंभ ठाकरे यांनी गोंदियातून केला. यानिमित्त येथील गुरूनानक शाळेच्या मैदानात आयोजित मेळाव्यात ठाकरे बोलत होते. मंचावर खासदार विनायक राऊत, नेते सुभाष देसाई, खासदार अशोक शिंदे, खासदार कृपाल तुमाने, विदर्भ जन आंदोलन समितीचे किशोर तिवारी, आमदार निलम गोऱ्हे, शिवसेना संपर्क नेते डॉ. दीपक सावंत, रमेश बक्शी, विलास चावरी, संपर्क प्रमुख सतीश हरडे, आमदार नरेंद्र भोंडेकर, आमदार आशिष जायस्वाल, आमदार संजय राठोड, माजी आमदार रमेश कुथे, जिल्हा प्रमुख राजकुमार कुथे, मुकेश शिवहरे उपस्थित होते. ठाकरे पुढे म्हणाले तुम्ही विश्वास ठेवा, शिवसेना तुमच्या पाठीशी आहे. ही सुरूवात फक्त गोंदियासाठी नाही तर विदर्भासाठी केली आहे. त्यामुळे संपूर्ण विदर्भ भगवा करून द्या. शिवबंधनावर बोलताना त्यांनी, कित्येकांनी अगोदर याची थट्टा केली. मात्र शिवबंधन हा फक्त दोरा नसून ते समाजाचं व महिलांच्या रक्षेच बंधन आहे. समाज व महिलांच्या रक्षणाची जबाबदारी त्यात असून लोकसभेत त्याची थट्टा करणाऱ्यांना या जनतेने जागा दाखवून उत्तर दिल्याचे ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरेंच्या आगमनानिमित्त बिरसी विमानतळ येथून युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी मोटारसायकल रॅली काढली होती. याप्रसंगी जिल्हा शिवसेनेच्यावतीने रमेश कुथे व राजु कुथे यांनी उद्धव ठाकरे यांना स्मृतीचिन्ह व तलवार भेट दिली. पश्चात मंचावरच शिवबंधनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये शिवसेनेच्या पदाधिकारी व शिवसैनिकांना ठाकरे यांनी बंधन बांधले. या कार्यक्रमात अनेकांनी शिवसेनत प्रवेश केला. (शहर प्रतिनिधी)