शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात संगणकाद्वारे शेती !

By admin | Updated: June 9, 2015 03:17 IST

पिकाला हवे तेव्हा आणि हवे तेवढे पाणी, खताची मात्रा आणि खताची वेळ केवळ एका बटणवर नियंत्रित होत असेल तर... आश्चर्य वाटते ना... पण हे शक्य केले लासिनातील एका शेतकऱ्याने

ज्ञानेश्वर मुंदे, यवतमाळपिकाला हवे तेव्हा आणि हवे तेवढे पाणी, खताची मात्रा आणि खताची वेळ केवळ एका बटणवर नियंत्रित होत असेल तर... आश्चर्य वाटते ना... पण हे शक्य केले लासिनातील एका शेतकऱ्याने. संगणकीकृत नियंत्रक आणि सौरऊर्जेद्वारे त्यांनी डाळिंब शेती फुलविली आहे. शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणारा हा प्रयोग विदर्भातील एकमेव आहे. विदर्भातील शेती म्हटली की, सर्वप्रथम कर्जाचा डोंगर आणि आत्महत्या करणारे शेतकरी असेच काहीसे चित्र डोळ्यांपुढे येते. त्यातही यवतमाळ हा जिल्हा शेतकरी आत्महत्यांसाठी कुप्रसिद्ध. अशा या जिल्ह्यातील लासिना येथील हरीश बाळकृष्ण त्रिवेदी यांनी शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली. संगणकाद्वारे नियंत्रित होणारी त्यांची शेती इतर शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणारी आहे. वेळ, पाणी, खत आणि मनुष्यबळाची बचत करणारे हे तंत्रज्ञान विदर्भात अगदी नवीन आहे. २१ जानेवारी २०१५ रोजी शेतीला संगणकीकृत करण्यास प्रारंभ झाला आणि अवघ्या ५ महिन्यांत म्हणजे १५ मेपासून त्यांच्या शेतात स्वयंचलित पद्धतीने खते आणि पाणी पिकांपर्यंत पोहोचत आहे. इस्रायली तंत्रज्ञानाचा वापर त्यांनी यासाठी केला आहे. संगणकीकृत नियंत्रकात एक तासापासून ते दोन महिन्यांपर्यंत पाणी आणि खताचा प्रोग्राम फिड करता येतो. विद्राव्य पद्धतीने खत पिकांपर्यंत पोहोचविले जाते. नत्र, स्फुरद आणि पालाश या तीन खतांसाठी वेगवेगळे तीन ड्रम ठेवले आहेत. हे ड्रम एका पाइपच्या माध्यमातून फर्टिगेशन पंपला जोडले आहे. फर्टिगेशन पंप सामू (पीएच) नियंत्रित करून पाणी आणि खत ड्रीपमधून झाडाजवळ जाते. यासाठी केवळ या शेतकऱ्याला एक बटन दाबावे लागते. या शेतात सौरऊर्जेवरील मोटरपंपही संगणक नियंत्रित आहे. पिकांच्या आवश्यकतेनुसार फिडिंग केलेल्या प्रोग्रामनुसार पाणी आणि खत आवश्यक असेल त्याचवेळेस मोटारपंप सुरू होतो. या स्वयंचलित खते व पाणी नियंत्रण पद्धतीने ७० टक्के खत, ७० टक्के पाणी आणि ८० टक्के मजुरीची बचत होते. सध्या त्यांच्या डाळिंबाच्या शेतीवर केवळ ६ महिला मजूर आणि ३ पुरुषांची मदत घेतली जाते. ताळमेळ आवश्यकआधुनिक शेतीसाठी मोठे भांडवल आवश्यक असते. शेतकऱ्यांनी जमाखर्चाचा ताळमेळ लावून शेती करावी. २४ तास परिश्रम करण्याची तयारी असेल तरच शेतीतून भरघोस उत्पादन घेता येते. छोटे-छोटे प्रयोग करून शेतीला प्रगत तंत्रज्ञानाची जोड देण्याची गरज असल्याचे हरीश त्रिवेदी सांगतात. पिकांसाठी संगीत थेरपीहरीश त्रिवेदी पिकांसाठी आता संगीत थेरपीचा वापर करणार आहेत. शेतात वॉटरप्रूफ स्पीकर लावून झाडांना संगीत ऐकविणार आहेत. प्रात:काली वाद्य संगीत, सकाळी भक्ती संगीत, सकाळी ९ ते १२ या वेळात उडत्या चालीची गाणी, दुपारी ४ ते ५ या वेळात बडबडगीते, सायंकाळी शास्त्रीय संगीत वाजविल्यास उत्पादनात ५० टक्केपर्यंत वाढ होते, असे त्रिवेदी यांनी सांगितले.