शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाइट हाऊस गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
3
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
4
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
5
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
6
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
8
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
9
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
10
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
11
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
13
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
14
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
15
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
16
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
17
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
18
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
19
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
20
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

वासवानी पिता पुत्राने जमविली अपसंपदा

By admin | Updated: September 25, 2014 01:41 IST

पदाचा दुरुपयोग करून लाखोंची मालमत्ता जमविल्याप्रकरणी नागपूर सुधार प्रन्यासचा माजी अधीक्षक अभियंता नानक पेसूमल वासवानी आणि त्याचा मुलगा हितेश वासवानी या दोघांविरुद्ध लाचलुचपत

एसीबीच्या चौकशीत उघड : जरीपटक्यात गुन्हे दाखलनागपूर : पदाचा दुरुपयोग करून लाखोंची मालमत्ता जमविल्याप्रकरणी नागपूर सुधार प्रन्यासचा माजी अधीक्षक अभियंता नानक पेसूमल वासवानी आणि त्याचा मुलगा हितेश वासवानी या दोघांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुन्हे दाखल केले. नासुप्रमध्ये कार्यरत असताना उघड आरोप आणि तक्रारी होत असल्यामुळे वासवानी कमालीचा वादग्रस्त झाला होता. या पार्श्वभूमीवर, वासवानी याला एसीबीने लाच घेताना रंगेहात पकडले होते. वासवानी याने गैरप्रकार करून प्रचंड मालमत्ता जमवितानाच त्याचा मुलगा हितेश याच्याही फायद्याचे अनेक सौदे केले होते. प्रलंबित प्रकरण मार्गी लावण्यासाठी संबंधित मंडळी नानक वासवानीसोबतच त्याचा मुलगा हितेश यालाही खूश ठेवत होते. दरम्यान, वासवानीला एसीबीने पकडल्यानंतर त्याने केलेल्या अनेक घोटाळ्यांचे धागेदोरेही तपास यंत्रणेच्या हाती लागले. त्यामुळे एसीबीच्या अधिकाऱ्यांनी वासवानी पिता-पुत्रांची उघड चौकशी सुरू केली. पॉलिसीचे कमिशन २० लाख हितेश एलआयसी एजंट म्हणून काम करायचा. नानक वासवानी खूश राहावे म्हणून एक कंत्राटदार हितेशकडून मोठ्या रकमेच्या दोन दोन पॉलिसी काढत होता. अशाप्रकारे हितेशला पॉलिसीच्या कमिशनपोटी १९ लाख काही हजारांची रक्कम मिळाली होती. दरम्यान, वासवानी पिता-पुत्राविरुद्ध गुन्हे दाखल झाले असले तरी या दोघांना लगेच अटक होणार नाही. त्यांची उद्यापासून कधीही चौकशी (समोरासमोर विचारपूस) सुरू होऊ शकते. सध्याच्या चौकशीत वासवानी पितापुत्राकडे आढळलेली अपसंपदा ‘किरकोळ’ असून, यापेक्षा त्यांच्याकडे कितीतरीपट जास्त अपसंपदा असल्याची जोरदार चर्चा आहे. या सर्वच प्रकाराची चर्चा झाल्यानंतर अटकेची कारवाई होईल.