कोरोनासोबत जगायचं म्हणजे नेमकं काय करायचं?...खुद्द मुख्यमंत्र्यांनीच समजावलं

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2020 08:46 AM2020-07-25T08:46:34+5:302020-07-25T09:50:47+5:30

Uddhav Thackeray Interview With Sanjay Raut : राज्यात कोरोना नियंत्रणासाठी राज्य सरकारसह आरोग्य यंत्रणा प्रयत्नशील आहे. राज्यात कोरोना नियंत्रणासाठी राज्य सरकारसह आरोग्य यंत्रणा प्रयत्नशील आहे

Uddhav Thackeray Interview With Sanjay Raut on CoronaVirus in Maharashtra | कोरोनासोबत जगायचं म्हणजे नेमकं काय करायचं?...खुद्द मुख्यमंत्र्यांनीच समजावलं

कोरोनासोबत जगायचं म्हणजे नेमकं काय करायचं?...खुद्द मुख्यमंत्र्यांनीच समजावलं

googlenewsNext

मुंबई - महाराष्ट्रातही कोरोनाग्रस्तांचा आकडा हा सातत्याने वाढत आहे. राज्यात कोरोना नियंत्रणासाठी राज्य सरकारसह आरोग्य यंत्रणा प्रयत्नशील आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 55.99 टक्के असले तरी आतापर्यंत कोरोना झालेल्या एकूण बाधित रुग्णांची संख्या 3 लाखांच्या वर आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याच दरम्यान शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'ला मुलाखत दिली. मुख्यमंत्र्यांनी कोरोना युद्धाची सविस्तर माहिती ही जनतेसमोर मांडली आहे. कोरोनाचे संकट हे जागतिक संकट आहे. तिसरे महायुद्ध समजा. संपूर्ण जग विषाणूशी लढत आहे. गाफील राहून चालणार नाही. लोकांचे प्राण वाचवणे हेच महत्त्वाचे आहे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. (Uddhav Thackeray Interview With Sanjay Raut)

शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतली, या मुलाखतीचा पहिला भाग आज प्रसिद्ध करण्यात आला आहे. कोरोनासोबत जगायचं म्हणजे नेमकं काय करायचं? हे खुद्द मुख्यमंत्र्यांनीच समजावलं आहे. "सार्वजनिक ठिकाणी गर्दी करत नाही, तोंडावर मास्क लावून फिरता. तोंडाला हात लावत नाही. हात सतत धुताय. तोपर्यंत काळजीचं कारण नाही. हे कोरोनासोबतचं जगणं आहे" असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. तसेच संपूर्ण यंत्रणा हे कोरोनाचं युद्ध लढतेय. मला काम करायचंय आणि जनतेला वाचवायचंय असं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. 

"जोपर्यंत आपण कोरोनासोबत जगणं स्वीकारत नाही तोपर्यंत परिस्थिती अवघडच असेल. अर्थात आता लोकांनी ते स्वीकारायला सुरुवात केली आहे. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बघा, आता आपण अंतर ठेवून बसलेलो नाही तर लोक पुन्हा यावरही टीका करतील  की तुम्ही नियमांचं पालन करताय असं म्हणताय पण आता तुमच्या तोंडावर मास्क नाहीय. पण एक लक्षात घ्या, आपण जिथे मुलाखत घेतोय तिथे आपल्या आजूबाजूला कोणीही नाही. आपल्यात सुद्धा अंतर आहे. आणि मोठी मोकळी अशी ही जागा आहे. अन्यथा आपण बंद खोलीत पूर्वी अशी मुलाखत घेत असू. म्हणून मी सांगतो, तुम्ही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करत नाही, तोंडावर मास्क लावून फिरताय. तोंडाला हात लावत नाही. हात सतत धुताय. तोपर्यंत काळजीचं कारण नाही. मी म्हणतो ते हे कोरोनासोबत जगणं आहे. एखाद्यावेळी अनावधानाने माझ्याकडूनही चूक होऊ शकते. एखादा नियम मोडला जाऊ शकतो. पण तेव्हा तुम्ही मला सांगायचं की, जरा प्लीज असं करू नका. हे जे आहे ना त्यालाच मी कोरोनासोबत जगणं म्हणतो" असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : अरे व्वा! देशातील वयोवृद्ध दाम्पत्याने जिंकली कोरोनाची लढाई, तब्बल 25 दिवसांनी केली मात

मोदी सरकारचा चीनला आणखी एक दणका; Helo Lite सहीत 'या' अ‍ॅप्सवर घालणार बंदी 

CoronaVirus News : कोरोनाचा विस्फोट! फक्त तीन दिवसांत देशात 1 लाख नवे रुग्ण; धडकी भरवणारा ग्राफ

CoronaVirus News : कोरोना संकटातील भयानक वास्तव! 50 मृतदेहांवर सामूहिक अंत्यसंस्कार, सरकारने दिलं 'हे' कारण

CoronaVirus News : बापरे! ताज्या हवेसाठी नातेवाईकांनी कोरोनाग्रस्ताला ICUतून बाहेर आणलं अन्...

CoronaVirus News : धक्कादायक! उपचारासाठी तीन रुग्णालयांनी दिला नकार, कोरोनामुळे डॉक्टरचा मृत्यू

 

Web Title: Uddhav Thackeray Interview With Sanjay Raut on CoronaVirus in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.