मोदी सरकारचा चीनला आणखी एक दणका; Helo Lite सहीत 'या' अ‍ॅप्सवर घालणार बंदी 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2020 11:26 AM2020-07-24T11:26:53+5:302020-07-24T11:55:30+5:30

लोकप्रिय अ‍ॅप टिकटॉकसह 59 चिनी अ‍ॅप्सवर मोदी सरकारने बंदी घातली आहे. सरकारच्या बंदीच्या आदेशानंतर आता आणखी एक मोठा दणका देणार आहे. Helo Lite सहीत काही अ‍ॅप्सवर बंदी घालणार आहे. 

IT ministry to ban more apps over links with China | मोदी सरकारचा चीनला आणखी एक दणका; Helo Lite सहीत 'या' अ‍ॅप्सवर घालणार बंदी 

मोदी सरकारचा चीनला आणखी एक दणका; Helo Lite सहीत 'या' अ‍ॅप्सवर घालणार बंदी 

googlenewsNext

नवी दिल्ली - केंद्रातील मोदी सरकारने चीनला मोठा दणका दिला आहे. लोकप्रिय अ‍ॅप टिकटॉकसह 59 चिनी अ‍ॅप्सवर मोदी सरकारने बंदी घातली आहे. माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने कलम 69 A च्या अंतर्गत ही बंदी घातली आहे. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असल्याचे सांगत 59 चिनी मोबाईल अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात आली. यामध्ये टिकटॉक, यूसी ब्राऊझर आणि हॅलो अ‍ॅप यासारख्या लोकप्रिय अ‍ॅप्सचा समावेश आहे. सरकारच्या बंदीच्या आदेशानंतर आता चीनला आणखी एक मोठा दणका देणार आहे. Helo Lite सहीत काही अ‍ॅप्सवर सरकार बंदी घालणार आहे. 

माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालय आता अनेक मोबाईल अ‍ॅप्सवर बंदी घालणार आहे. प्रामुख्याने चीनशी संबंधित असलेल्या आणि चिनी मूळ असलेल्या अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेणार आहे. काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती दिली आहे. Helo Lite, ShareIt Lite, Bigo Lite and VFY Lite या अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात येणार असून Google playstore आणि Apple app store वरून देखील हटवण्यात आले आहे. एका इंग्रजी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

भारत सरकारने काही दिवसांपूर्वी 59 अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. ही अ‍ॅप्स भारताच्या एकात्मतेला आणि सार्वभौमत्वाला धक्का पोहचवणारी असून देशाच्या सुरक्षेसाठी आणि सुव्यवस्थेसाठी या अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात येत आहे असं सरकारने सांगितलं होतं. तसेच  भारताच्या गुप्तचर संस्थांनी धोकादायक अ‍ॅप्सची यादी आधीच केंद्र सरकारला दिली होती. यानंतर केंद्र सरकारने आपल्या स्तरावर या अ‍ॅप्सची माहिती घेतली. हे अ‍ॅप्स धोकादायक असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर केंद्र सरकारने त्यांच्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता आणखी काही अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात येणार आहे. 

लडाख सीमेवर भारत आणि चीन यांच्यातील तणाव वाढला आहे. गेल्या 15 जूनला लडाखमधील गलवान खोऱ्यात एलएसी सीमेवर भारत आणि चीनच्या सैन्यांत हिंसक चकमक झाली. यात भारताचे 20 जवान शहीद झाले. यानंतर देशात चीन विरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे.  याशिवाय, भारतात विकल्या जाणाऱ्या चिनी वस्तूंवर आणि चिनी मोबाईल अ‍ॅप्सवर बहिष्कार टाकण्याची मागणी अनेकांकडून मोठ्या प्रमाणात होत  आहे.

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : कोरोनाचा विस्फोट! फक्त तीन दिवसांत देशात 1 लाख नवे रुग्ण; धडकी भरवणारा ग्राफ

CoronaVirus News : कोरोना संकटातील भयानक वास्तव! 50 मृतदेहांवर सामूहिक अंत्यसंस्कार, सरकारने दिलं 'हे' कारण

CoronaVirus News : बापरे! ताज्या हवेसाठी नातेवाईकांनी कोरोनाग्रस्ताला ICUतून बाहेर आणलं अन्...

CoronaVirus News : धक्कादायक! उपचारासाठी तीन रुग्णालयांनी दिला नकार, कोरोनामुळे डॉक्टरचा मृत्यू

"देश अडचणीत असताना पंतप्रधान मोदी स्वत:ची प्रतिमा घडवण्यात मग्न", राहुल गांधीचा घणाघात

चिंता वाढली! कोरोना पाठोपाठ देशावर येतंय आणखी एक मोठं संकट

CoronaVirus News : बापरे! परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण, पालकांमध्ये भीतीचे वातावरण

Read in English

Web Title: IT ministry to ban more apps over links with China

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.