Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक

By जितेंद्र ढवळे | Published: May 25, 2024 12:00 AM2024-05-25T00:00:26+5:302024-05-25T00:00:54+5:30

Nagpur Crime News: पुण्यात मद्यधुंद धनिक बाळाने दोघांचे जीव घेतले. यानंतर राज्यभरातील पोलिस यंत्रणा अलर्ट असताना नागपुरातील महाल परिसरातील झेंडा चौकाजवळ शुक्रवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास एका मद्यधुंद कारचालकाने तिघांना धडक देत जखमी केले.

Nagpur: Drunken driver's misdeeds, three were blown up at Zenda Chowk, minor seriously injured, three arrested | Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक

Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक

नागपूर - पुण्यात मद्यधुंद धनिक बाळाने दोघांचे जीव घेतले. यानंतर राज्यभरातील पोलिस यंत्रणा अलर्ट असताना नागपुरातील महाल परिसरातील झेंडा चौकाजवळ शुक्रवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास एका मद्यधुंद कारचालकाने तिघांना धडक देत जखमी केले. यात महिलेसह तीन महिन्यांचा चिमुकला आणि एक इसम जखमी झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

सन्नी चव्हाण, अंशुल ढाले, आकाश निमोरिया अशी अटक करण्यात आलेल्या युवकांची नावे आहेत. ते तिघेही मद्यधुंद असल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास झेंडा चौकात भरधाव वेगाने एक चारचाकी आली. त्याने महिला आणि तिच्या मुलासह एका इसमाला उडविले. यात महिला आणि चिमुकल्या गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. ही माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, जखमींना मेयो रुग्णालयात दाखल केले. याशिवाय तपास करीत तिघांनाही ताब्यात घेतले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला आहे.

Web Title: Nagpur: Drunken driver's misdeeds, three were blown up at Zenda Chowk, minor seriously injured, three arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.