CoronaVirus News : कोरोना संकटातील भयानक वास्तव! 50 मृतदेहांवर सामूहिक अंत्यसंस्कार, सरकारने दिलं 'हे' कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2020 09:34 AM2020-07-24T09:34:05+5:302020-07-24T16:16:32+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाच्या भीतीने अनेकांनी आपल्या नातेवाईकांचे मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला आहे. तर अनेक ठिकाणी मृतांची संख्या वाढल्याने अंत्यसंस्कार करायला जागाच नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

CoronaVirus Marathi News 50 Covid19 patients cremated one due to lack transportation | CoronaVirus News : कोरोना संकटातील भयानक वास्तव! 50 मृतदेहांवर सामूहिक अंत्यसंस्कार, सरकारने दिलं 'हे' कारण

CoronaVirus News : कोरोना संकटातील भयानक वास्तव! 50 मृतदेहांवर सामूहिक अंत्यसंस्कार, सरकारने दिलं 'हे' कारण

googlenewsNext

नवी दिल्ली- कोरोनावर मात करण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. असे असतानाही कोरोनामुळे मृतांचा आकडा वाढतच चालला आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे आतापर्यंत हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 12 लाखांवर गेली आहे. कोरोनाच्या भीतीने अनेकांनी आपल्या नातेवाईकांचे मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला आहे. तर अनेक ठिकाणी मृतांची संख्या वाढल्याने अंत्यसंस्कार करायला जागाच नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच दरम्यान अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. कोरोनाच्या संकटातील एक भयानक वास्तव समोर आलं आहे. एकाच वेळी तब्बल 50 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे. तेलंगणामध्ये रुग्णांवर सामूहिक अंत्यसंस्कार केल्याची घटना घडली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या मृतदेहावर ESI रुग्णालयाच्या स्मशानभूमीत सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले. 

सोशल मीडियावर या घटनेचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला आहे. जवळपास 50 हून अधिक कोरोनाग्रस्त मृतदेहांवर अंत्यसंस्कार केल्याची घटना घडली. या घटनेवर तेलंगणाचे वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. के. रमेश रेड्डी यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. वाहतुकीचा आणि मनुष्यबळाचा अभाव असल्यानं एकाच ठिकाणी 50 हून अधिक मृतदेहांवर अंत्यसंस्कार केल्याचं स्पष्टीकरण रेड्डी यांनी दिलं आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या 50 हून अधिक रुग्णांचे मृतदेह घेऊन जाण्यासाठी वाहतूक आणि पालिका अधिकारी अपुरे असल्याने त्यांच्यावर सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले.

सोशल मीडियावर अंत्यसंस्काराचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तेलंगणा आरोग्य विभागाकडूनही यासंदर्भात स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. कोरोनामुळे एका दिवसात एवढ्या लोकांचा मृत्यू झाला नाही. तर गेल्या 3 दिवसांपासून कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचे मृतदेह रुग्णालयात होते. वाहतुकीच्या अभावामुळे हे करण्याची वेळ आल्याची माहिती रेड्डी यांनी दिली आहे. एका इंग्रजी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : बापरे! ताज्या हवेसाठी नातेवाईकांनी कोरोनाग्रस्ताला ICUतून बाहेर आणलं अन्...

CoronaVirus News : धक्कादायक! उपचारासाठी तीन रुग्णालयांनी दिला नकार, कोरोनामुळे डॉक्टरचा मृत्यू

"देश अडचणीत असताना पंतप्रधान मोदी स्वत:ची प्रतिमा घडवण्यात मग्न", राहुल गांधीचा घणाघात

चिंता वाढली! कोरोना पाठोपाठ देशावर येतंय आणखी एक मोठं संकट

CoronaVirus News : बापरे! परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण, पालकांमध्ये भीतीचे वातावरण

गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या कर्नल संतोष बाबू यांच्या पत्नी झाल्या उपजिल्हाधिकारी

CoronaVirus News : भयंकर! कोरोनाग्रस्ताच्या मृत्यूनंतर कुटुंबाने पेटवून दिली रुग्णवाहिका

Web Title: CoronaVirus Marathi News 50 Covid19 patients cremated one due to lack transportation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.