"देश अडचणीत असताना पंतप्रधान मोदी स्वत:ची प्रतिमा घडवण्यात मग्न", राहुल गांधीचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2020 01:40 PM2020-07-23T13:40:08+5:302020-07-23T13:57:37+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. देश अडचणीत असताना पंतप्रधान मोदी स्वत:ची प्रतिमा घडवण्यात मग्न असल्याचं म्हटलं आहे.

rahul gandhi says pm is 100 percent focused on building his own image | "देश अडचणीत असताना पंतप्रधान मोदी स्वत:ची प्रतिमा घडवण्यात मग्न", राहुल गांधीचा घणाघात

"देश अडचणीत असताना पंतप्रधान मोदी स्वत:ची प्रतिमा घडवण्यात मग्न", राहुल गांधीचा घणाघात

Next

नवी दिल्ली - काँग्रेसचे नेते राहुल गांधीभारत आणि चीनमध्ये असलेल्या तणावाच्या मुद्द्यावरून आक्रमक झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. देश अडचणीत असताना पंतप्रधान मोदी स्वत:ची प्रतिमा घडवण्यात मग्न असल्याचं म्हटलं आहे. "पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वत:ची प्रतिमा तयार करण्यावर 100 टक्के लक्ष केंद्रीत केले आहे. भारतातील सर्व संस्था तेच काम करण्यामध्ये व्यस्त आहेत. एका माणसाची प्रतिमा राष्ट्रीय दृष्टीकोनाला पर्याय असू शकत नाही" असं म्हणत राहुल यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. 

राहुल गांधी यांनी गुरुवारी (23 जुलै) आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये त्यांनी नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे. "मजबूत स्थितीमध्ये राहून चीनशी चर्चा करत असाल, तरच तुम्ही त्यांच्याशी चर्चा करु शकता. चीनने जर तुमचा कमकुवतपणा पकडला, तर अडचण आहे. चीनचा विषय हाताळण्यासाठी तुमच्याकडे दृष्टीकोन असला पाहिजे. भारताला जागतिक दृष्टीकोनाची गरज आहे" असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

"आपल्याला आपली पद्धत बदलावी लागेल, विचार बदलावा लागेल. मोठा आणि दीर्घकालीन विचार न केल्यामुळे आपण एक संधी गमावू शकतो. आपण आपसातच लढत आहोत. आपल्याकडे दृष्टीकोनही नाही हे यातून दिसत आहे. पंतप्रधानांना प्रश्न विचारणे, ही माझी जबाबदारी आहे. दृष्टीकोन देणे ही पंतप्रधानांची जबाबदारी आहे. पण मी, तुम्हाला खात्रीने सांगतो, की पंतप्रधानांकडे दूरदृष्टी नाही. त्यामुळेच चीनने आपल्या हद्दीत घुसखोरी केली आहे" असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. 

काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. 'मोदी सरकारच्या भ्याडपणाची मोठी किंमत देशाला मोजावी लागेल' असं म्हणत राहुल यांनी सरकारवर हल्लाबोल केला होता. "चीनने भारताच्या जमिनीवर कब्जा मिळवलाय आणि भारत सरकार 'चेम्बरलेन'सारखं वागत आहे. यामुळे चीन आणखी पुढे जाईल. भारताला मात्र मोदी सरकारच्या भ्याडपणाची मोठी किंमत मोजावी लागेल" असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या

चिंता वाढली! कोरोना पाठोपाठ देशावर येतंय आणखी एक मोठं संकट

CoronaVirus News : बापरे! परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण, पालकांमध्ये भीतीचे वातावरण

गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या कर्नल संतोष बाबू यांच्या पत्नी झाल्या उपजिल्हाधिकारी

CoronaVirus News : भयंकर! कोरोनाग्रस्ताच्या मृत्यूनंतर कुटुंबाने पेटवून दिली रुग्णवाहिका

CoronaVirus News : कोरोना वॅक्सीन नेमकी कधी उपलब्ध होणार?, WHO ने दिली महत्त्वाची माहिती

Video - शाब्बास मित्रा, जिंकलंस! गाढवाची मुलाखत घेऊन पत्रकाराने मास्क न लावणाऱ्यांना शिकवला चांगलाच धडा

Web Title: rahul gandhi says pm is 100 percent focused on building his own image

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.